मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : टीम इंडियाचा धक्कादायक पराभवाला जबाबदार कोण? कॅप्टन रोहितने दिलं थेट उत्तर

T20 World Cup : टीम इंडियाचा धक्कादायक पराभवाला जबाबदार कोण? कॅप्टन रोहितने दिलं थेट उत्तर

रोहित आणि विराट

रोहित आणि विराट

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा दारूण पराभव केला आहे. भारताच्या या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

ऍडलेड, 10 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा दारूण पराभव केला आहे. भारताने दिलेलं 169 रनचं आव्हान इंग्लंडने एकही विकेट न गमावता 16 ओव्हरमध्येच पार केलं. इंग्लंडकडून एलेक्स हेल्सने नाबाद 86 आणि जॉस बटलरने नाबाद 80 रन केले.

इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. केएल राहुल पुन्हा एकदा मोठ्या सामन्यात अपयशी ठरला. फक्त 5 रन करून राहुल पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार रोहित शर्मानेही संथ बॅटिंग केली. 28 बॉलमध्ये 27 रन करून रोहित आऊट झाला. पहिल्या 10 ओव्हरमध्ये भारताला फक्त 62 रन करता आल्या.

भारताच्या पराभवाचा शेजाऱ्यांना आनंद, पाकिस्तानी पंतप्रधानांनी जखमेवर मीठ चोळलं!

सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. 'टीमच्या या कामगिरीमुळे मी खूप निराश आहे. आम्ही इनिंगच्या शेवटी चांगली बॅटिंग केली, पण आमच्या बॅटिंगमध्ये अजिबात धार नव्हती. ही खेळपट्टी अशी नव्हती जिकडे टीम 16 ओव्हरमध्ये मॅच जिंकेल. बॉलिंगमध्ये आमची कामगिरी खूपच निराशाजनक झाली. सेमी फायनलसारख्या मोठ्या सामन्यात दबाव झेलणं सोपं नसतं, पण आमचे सगळेच खेळाडू आयपीएलच्या अनेक सामन्यांमध्ये दबावात खेळतात. तुम्ही कोणालाही दबावात कसं खेळायचं हे शिकवू शकत नाही. ज्याप्रकारे आम्ही बॉलिंग सुरू केली, ती अजिबातच आदर्श नव्हती,' असं परखड मत रोहितने व्यक्त केलं.

'आम्ही सुरूवातीला थोडे नर्व्हस होतो, पण विजयाचं श्रेय इंग्लंडच्या ओपनरना द्यावं लागेल, त्यांनी चांगला खेळ केला. आम्हाला योग्य दिशेने बॉलिंग करणं गरजेचं होतं. इंग्लंडच्या बॅटरना मोठे शॉट खेळण्यापासून रोखण्याची गरज होती, पण यात आम्ही अपयशी ठरलो. आमच्या रणनितीची योग्य अंमलबजावणी आम्हाला करता आली नाही,' असं वक्तव्य रोहित शर्माने केलं.

टीम इंडिया पराभवाच्या धक्क्यात असतानाच शोएब अख्तरने डिवचलं, म्हणाला...

First published:

Tags: Rohit sharma, T20 world cup, T20 world cup 2022, Team india