मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup Final : करनचा वार, स्टोक्सचा प्रहार! इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन करणारे 5 हिरो

T20 World Cup Final : करनचा वार, स्टोक्सचा प्रहार! इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन करणारे 5 हिरो

टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला आहे. इंग्लंडला विजयासाठी 138 रनचं आव्हान मिळालं होतं, हे आव्हान त्यांनी यशस्वीरित्या पार केलं

टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला आहे. इंग्लंडला विजयासाठी 138 रनचं आव्हान मिळालं होतं, हे आव्हान त्यांनी यशस्वीरित्या पार केलं

टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला आहे. इंग्लंडला विजयासाठी 138 रनचं आव्हान मिळालं होतं, हे आव्हान त्यांनी यशस्वीरित्या पार केलं

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मेलबर्न, 13 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला आहे. इंग्लंडला विजयासाठी 138 रनचं आव्हान मिळालं होतं, हे आव्हान त्यांनी यशस्वीरित्या पार केलं. इंग्लंडच्या या विजयात कर्णधार जॉस बटलरची भूमिका महत्त्वाची होती. बटलरने 26 रनची छोटी पण महत्त्वाची खेळी केली. एलेक्स हेल्स पहिल्याच ओव्हरला आऊट झाल्यानंतरही बटलरने पाकिस्तानच्या बॉलिंगवर आक्रमण सुरूच ठेवलं. इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात 5 खेळाडूंची भूमिका महत्त्वाची राहिली.

सॅम करन : डावखुरा फास्ट बॉलर असणाऱ्या सॅम करनने 4 ओव्हरमध्ये फक्त 12 रन देऊन पाकिस्तानच्या 3 विकेट घेतल्या. करनने त्याच्या बॉलिंगमध्ये 15 डॉट बॉल टाकले. मोहम्मद रिझवानला बोल्ड करून करनने इंग्लंडला पहिलं यश मिळवून दिलं, यानंतर त्याने धोकादायक ठरू शकणाऱ्या शान मसूदलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

आदिल रशीद : इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात लेग स्पिनर आदिल रशीदचाही वाटा आहे. रशीदने 4 ओव्हरमध्ये 22 रन देऊन 2 विकेट घेतल्या. आदिल रशीदनेही त्याच्या 4 ओव्हरमध्ये 10 डॉट बॉल टाकले. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचीही विकेट घेतली. वर्ल्ड कपच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये रशीदने 12 ओव्हरमध्ये 89 रन देऊन एकही विकेट घेतली नव्हती, पण मागच्या तीन सामन्यांमध्ये त्याने 12 ओव्हरमध्ये फक्त 58 रन देऊन 4 विकेट मिळवल्या.

इंग्लंडच्या या 5 गोष्टींमधून टीम इंडिया शिकणार! रोहित कुठे चुकला?

क्रिस जॉर्डन : इंग्लंडचा टी-20 स्पेशलिस्ट खेळाडू क्रिस जॉर्डननेही उत्कृष्ट बॉलिंग केली. पाकिस्तानने शेवटच्या 45 बॉलमध्ये 5 विकेट गमावल्या, ज्यात जॉर्डनची भूमिका महत्त्वाची आहे. जॉर्डनने 4 ओव्हरमध्ये 27 रन देऊन 2 विकेट घेतल्या, यात 9 डॉट बॉलचा समावेश आहे. जॉर्डनने शादाब खानची विकेटही घेतली.

बेन स्टोक्स : इंग्लंडच्या विजयात बेन स्टोक्स हा सगळ्यात मोठा हिरो ठरला. 138 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्टोक्सने हॅरी ब्रुकसोबत चौथ्या विकेटसाठी 42 बॉलमध्ये 39 रनची पार्टनरशीप केली. यानंतर स्टोक्स आणि मोईन अली यांच्यात 33 बॉलमध्ये नाबाद 47 रनची पार्टनरशीप झाली, ज्यामुळे इंग्लंडने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. स्टोक्सने फायनलमध्ये नाबाद अर्धशतक केलं.

First published:

Tags: Ben stokes, England, T20 world cup, T20 world cup 2022