मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : टीम इंडियासाठी Good News! न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचसाठी अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू फिट

T20 World Cup : टीम इंडियासाठी Good News! न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचसाठी अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू फिट

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाचं (Team India) सेमी फायनलला पोहोचणं अफगाणिस्तानवर अवलंबून आहे. जर रविवारच्या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा (Afghanistan vs New Zealand) पराभव केला आणि सोमवारी भारताने नामबियाला हरवलं तर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचेल.

पुढे वाचा ...

दुबई, 6 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाचं (Team India) सेमी फायनलला पोहोचणं अफगाणिस्तानवर अवलंबून आहे. स्पर्धेच्या सुरुवातीलाच टीम इंडियाचा पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला, यानंतर भारताने अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडला मोठ्या फरकाने हरवलं. भारताचे 4 मॅचमध्ये 4 तर न्यूझीलंडचे 4 मॅचमध्ये 6 पॉईंट्स आहेत. जर रविवारच्या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा (Afghanistan vs New Zealand) पराभव केला आणि सोमवारी भारताने नामबियाला हरवलं तर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचेल. पण न्यूझीलंडने अफगाणिस्तानला धूळ चारली तर मात्र रविवारीच टीम इंडियाचं स्वप्न भंगेल.

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातल्या सामन्याआधी टीम इंडियासाठी चांगली बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानचा स्टार ऑफ स्पिनर मुजीब उर रहमान (Mujeeb Ur Rehman) दुखापतीमुळे भारताविरुद्ध खेळला नव्हता, पण आता न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचसाठी तो फिट झाला आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये एका इनिंगमध्ये 5 विकेट घेणारा मुजीब एकमेव खेळाडू आहे. स्कॉटलंडविरुद्ध मुजीबने 20 रन देऊन 5 विकेट घेतल्या. दुखापतीमुळे मुजीब फक्त दोनच मॅच खेळू शकला होता. शनिवारी मुजीबने जिममध्ये व्यायाम करत असतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओवरून मुजीब न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचसाठी फिट झाल्याचं बोललं जात आहे.

20 वर्षांच्या मुजीबचं आंतरराष्ट्रीय टी-20 करियर शानदार आहे. 21 मॅचमध्ये 15 च्या सरासरीने त्याने 31 विकेट घेतल्या. मुजीबचा स्ट्राईक रेट 15.4 चा आहे, म्हणजेच तो जवळपास प्रत्येक 16 बॉलनंतर विकेट घेतो. मुजीबचा इकोनॉमी रेटही 5.96 चा आहे. एकूण 152 टी-20 मध्ये मुजीबने 171 विकेट घेतल्या. 43 वनडेमध्ये 22 च्या सरासरीने 70 विकेट मिळवल्या आहेत.

अफगाणिस्तानच्या टीमने युएईमध्ये न्यूझीलंडपेक्षा जास्त टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. तसंच अफगाणिस्तानचं युएईमधलं रेकॉर्ड न्यूझीलंडपेक्षाही चांगलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तान न्यूझीलंडला कडवी झुंज देईल, अशी भारतीय क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा आहे. अफगाणिस्तानकडे मुजीबशिवाय राशिद खान आणि मोहम्मद नबी यांच्यासारखे उत्कृष्ट स्पिन बॉलर आहेत. राशिदने या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 4 मॅचमध्ये 5.93 च्या इकोनॉमी रेटने 7 विकेट घेतल्या आहेत.

T20 World Cup : मॅच अफगाणिस्तान-न्यूझीलंडची पण भीती पाकिस्तानला, शोएब अख्तरच्या विधानाने खळबळ

First published:

Tags: Afghanistan, New zealand, T20 world cup, Team india