नवी दिल्ली, 28 एप्रिल: सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) फास्ट बॉलर उमरान मलिकनं (Umran Malik) या आयपीएलमध्ये सर्वांना प्रभावित केले आहे. गुजरात टायटन्स विरूद्ध बुधवारी झालेल्या मॅचमध्ये उमराननं 25 रन देत 5 विकेट्स घेतल्या. त्यानं आत्तापर्यंत 8 मॅचमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. त्यापेक्षाही त्यानं सातत्यानं 145 किमी प्रती तास वेगानं बॉलिंग केली आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असतानाच काँग्रेसचे दिग्गज नेते पी चिदंबरम हेदेखील उमरानचे फॅन बनले आहेत. त्यांनी त्याचा वेग पाहून बीसीसीआयकडे खास मागणी केली आहे. चिदंबरम यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट करून उमरानचे जोरदार कौतुक केले. उमरान मलिक नावाचे वादळ त्याच्यासमोर येणारे सर्व काही नष्ट करत आहे. अशा शब्दात त्याचे कौतुक केले आहे. IPL 2022 : उमरान मलिकच्या वेगानं गावसकर प्रभावित, BCCI ला दिला खास सल्ला उमरानचा वेग आणि आक्रमकता मंत्रमुग्ध करणारी आहे. गुजरातविरुद्धची त्याची कामगिरी पाहिल्यानंतर तो या मोसमातील सर्वात मोठा शोध आहे यात शंका नाही. बीसीसीआयने उमरानसाठी विशेष प्रशिक्षकाची नियुक्ती करावी आणि त्याला भारतीय संघात स्थान द्यावे. अशी खास मागणी त्यांनी दुसरे ट्विट करत केली आहे. चिदंबरम यांच्यापूर्वी शशी थरुर यांनी आम्हाला या खेळाडूला लवकरात लवकर भारतीय जर्सीमध्ये पाहायचे आहे. उमरान किती अद्भुत प्रतिभा आहे. ते कुठेतरी हरवण्याआधी आपण त्यांना संधी दिली पाहिजे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करावा. उमरान आणि जसप्रीत बुमराह मिळून इंग्रजांना घाबरवतील आणि नष्ट करतील. असे ट्विट करत टीम इंडियात स्थान देण्याची मागणी केली होती.
The BCCI should give him an exclusive coach and quickly induct him into the national team
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) April 27, 2022
उमराननं या मॅचमध्ये 5 विकेट्स घेतल्या. त्यापैकी 4 जणांना त्यानं बोल्ड केलं. साहाला 152.8 किमी, डेव्हिड मिलरला 148.7 किमी, अभिनव मनोहरला 146.8 किमी तर शुभमन गिलला त्यानं 144.2 किमी प्रती तास (kph) गतीनं बोल्ड केलं. तर हार्दिक पांड्याला 141.1 किमी प्रती तास गतीनं मार्को जेनसनच्या हाती कॅच आऊट केलं.