मुंबई, 27 एप्रिल : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) या आयपीएल सिझनमध्ये कुणीही कल्पना केली नसेल इतकी घसरण झाली आहे. मुंबई इंडियन्सनं पहिले आठही सामने गमावले आहेत. या सिझनमध्ये एकही सामना न जिंकलेली मुंबई ही एकमेव टीम आहे. सलग आठ पराभवानंतर मुंबईचं स्पर्धेतील आव्हान देखील संपुष्टात आलं आहे. रोहित शर्मासाठी खेळाडू म्हणून देखील हा सिझन निराशाजनक जात आहे. रोहितनं 8 सामन्यांमध्ये 19.12 च्या सरासरीनं 153 रन केले आहेत. त्याला अद्यापही एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. तसंच त्याचा स्ट्रा्ईक रेट 126.44 इतका आहे. यंदा आयपीएल ऑक्शनंतर सर्वच टीमची नव्यानं रचना झाली. मुंबई इंडियन्सचे क्विंटन डी कॉक, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या हे मागील सिझनमधील प्रमुख खेळाडू आता दुसऱ्या टीममध्ये आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मुंबईच्या बॅटींगची मोठी जबाबदारी रोहितवर आली होती. त्यानं ही जबाबदारी अद्याप पूर्ण केलेली नाही. रोहित शर्माला फक्त क्रिकेटच्या मैदानात नाही तर फुटबॉलच्या मैदानातही निराशा सहन करावी लागत आहे. युनियन ऑफ युरोपीयन फुटबॉल असोसिएशन (UEFA Champions League) स्पर्धेतील मंगळवारी रात्री झालेल्या सेमी फायनलमध्ये रोहितची आवडती टीम असलेल्या रियाल माद्रीदचा मँचेस्टर सिटीकडून (Real Madrid vs Manchester City) 3-4 असा निसटता पराभव झाला. रोहित शर्मा हा रियाल माद्रीदचा फॅन आहे. आयपीएलच्या व्यस्त वेळापत्रकामध्येही त्याचं या मॅचवर लक्ष होतं. त्यानं माद्रीदच्या बाजूनं ट्विट देखील केलं होतं.
Come on Madrid @realmadrid
— Rohit Sharma (@ImRo45) April 26, 2022
फक्त स्पेन नाही तर जगातील एक बलाढ्य फुटबॉल क्लब असलेल्या रियाल माद्रीदनं आत्तापर्यंत विक्रमी 13 वेळा युरोपीयन लाीग स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. त्यांचा मागील सिझनमधील फायनलमध्ये पराभव झाला होता. IPL 2022 : 20 वर्षांचा मुलगा ठरला RCB वर भारी, गिलख्रिस्ट आणि कॅलीसची केली बरोबरी आता या स्पर्धेच्या सेमी फायनलमधील पहिल्या मॅचमध्ये माद्रीद पराभूत झालीय. या पराभवानं त्यांच्या वाटचालीला धक्का बसलाय. आता त्यांना सेमी फायनलमधील दुसरी लढत चांगल्या गोलफरकानं जिंकावी लागेल.

)







