जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : 20 वर्षांचा मुलगा ठरला RCB वर भारी, गिलख्रिस्ट आणि कॅलीसची केली बरोबरी

IPL 2022 : 20 वर्षांचा मुलगा ठरला RCB वर भारी, गिलख्रिस्ट आणि कॅलीसची केली बरोबरी

IPL 2022 : 20 वर्षांचा मुलगा ठरला RCB वर भारी, गिलख्रिस्ट आणि कॅलीसची केली बरोबरी

आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सची (Rajasthan Royals) विजयी घौडदौड सुरूच आहे. राजस्थाननं मंगळवारी मिळवलेल्या विजयामध्ये त्यांचा 20 वर्षांचा खेळाडू हिरो ठरला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सची (Rajasthan Royals) विजयी घौडदौड सुरूच आहे. मंगळवारी पुण्यात झालेल्या सामन्यात राजस्थाननं रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) 29 रननं पराभव केला. राजस्थाननं दिलेलं 145 रनचं आव्हान आरसीबीला पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 115 रन काढून ऑल आऊट झाली. राजस्थानच्या या विजयात त्यांचा ऑल राऊंडर रियान परागचं (Riyan Parag) मोठं योगदान होतं. 20 वर्षांचा रियान राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. त्यानं या सामन्यात 31 बॉलमध्ये नाबाद 56 रनची खेळी केली. त्याचबरोबर 4 कॅच देखील घेतल्या. आयपीएलच्या एकाच सामन्यात अर्धशतक आणि 4 कॅच घेण्याचा क्लबमध्ये परागची आता एन्ट्री झाली आहे. परागनं यावेळी अ‍ॅडम गिलख्रिस्ट, जॅक कॅलिस यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली. हा रेकॉर्ड करणारा तो आयपीएलच्या इतिहासातील तिसरा आणि पहिलाच भारतीय खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑल राऊंडर जॅक कॅलिसनं 2011 साली कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना डेक्कन चार्जर्स विरूद्ध हा रेकॉर्ड केला होता. तर गिलख्रिस्टनं 2012 साली किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना  चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध या रेकॉर्डची बरोबरी केली होती. त्यानंतर 10 वर्षांनी पहिल्यांदाच कुणी या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. परागनं या मॅचमध्ये विराट कोहली, सूयश प्रभूदेसाई, शाहबाज नदीम आणि हर्षल पटेल या चौघांचे कॅच घेतले. IPL 2022 : अंपायरमुळे 6 सिक्स मारता आले नाहीत! No Ball वादावर दिल्लीच्या खेळाडूचा अजब दावा आरसीबीविरुद्धच्या या विजयासोबतच राजस्थान पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर गेली आहे. राजस्थानने 8 पैकी 6 मॅचमध्ये विजय मिळवला तर 2 मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे. आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे, त्यांनी 9 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. राजस्थानकडून कुलदीप सेनला (Kuldeep Sen) सर्वाधिक 4 विकेट मिळाल्या, तर आर.अश्विनने 3 आणि प्रसिद्ध कृष्णाने 2 विकेट घेतल्या.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात