जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / शुभमन आणि सारा गेले डेटवर? हे फोटो खूप काही सांगून जातात

शुभमन आणि सारा गेले डेटवर? हे फोटो खूप काही सांगून जातात

शुभमन आणि सारा गेले डेटवर? हे फोटो खूप काही सांगून जातात

शुभमन आणि सारा गेले डेटवर? हे फोटो खूप काही सांगून जातात

शुभमन आणि सारा तेंडुलकर हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मागील अनेक महिन्यांपासून रंगत आहेत. मात्र व्हॅलेंटाईन डे ला शुभमनने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेला फोटो खूप काही सांगून जातो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 फेब्रुवारी : मंगळवार 14 फेब्रुवारी रोजी जगभरात व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या व्हॅलेंटाईन सोबत प्रेमाचा दिवस साजरा करत यादिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. परंतु या गोतावळ्यात भारताचा युवा स्टार क्रिकेटपटू शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोवरून शुभमन आणि सारा व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी डेटवर गेल्याचा निष्कर्ष नेटकऱ्यांनी काढला आहे. शुभमन आणि सारा तेंडुलकर हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मागील अनेक महिन्यांपासून रंगत आहेत. तसेच शुभमन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचेही अनेक फोटो व्हायरल झाले असून शुभमन गिल नक्की कोणत्या साराला डेट करतो या विषयी नेहमीच चर्चा असते. मात्र अद्याप यावर शुभमनने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र व्हॅलेंटाईन डेला शुभमनने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेला फोटो खूप काही सांगून जातो.

News18लोकमत
News18लोकमत

News18

शुभमन गिलने त्याच्या सोशल मीडियावर काल  एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये शुभमन हा लंडन मधील एका हॉटेलमध्ये बसून कॉफीचा आनंद घेत आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की शुभमनच्या फोटोमध्ये दिसणारे हॉटेल आणि सारा तेंडुलकरने काही महिन्यांपूर्वी शेअर केलेल्या फोटोमधील हॉटेल एकच आहे. त्यामुळे हे फोटो जेव्हा दोघांनी काढले तेव्हा दोघेही एकमेकांसोबतच होते असा निष्कर्ष नेटकऱ्यांकडून काढला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात