जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / चर्चा अर्जुन तेंडुलकरची, पण भाव खाल्ला अकोल्याच्या अर्थवने!

चर्चा अर्जुन तेंडुलकरची, पण भाव खाल्ला अकोल्याच्या अर्थवने!

चर्चा अर्जुन तेंडुलकरची, पण भाव खाल्ला अकोल्याच्या अर्थवने!

श्रीलंकेत १९ वर्षांखालील संघाविरुद्ध कसोटी मालिका सुरू झाली आहे. हा दौरा सुरू झाला तेव्हापासून अर्जुन तेंडुलकरच्या नावाची चर्चा होती. पण या दौऱ्यावर आता छाप पाडलीय ती अकोल्याच्या अर्थव तायडे याने.

  • -MIN READ
  • Last Updated :

    अकोला, ता. 24 जुलै :  श्रीलंकेत कोलंबो येथे १९ वर्षांखालील संघाविरुद्ध कसोटी मालिका सुरू झाली आहे. हा दौरा सुरू झाला तेव्हापासून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या नावाची चर्चा होती. पण या दौऱ्यावर आता छाप पाडलीय ती दुसऱ्याच मराठमोळ्या खेळाडूने. सलग दोन सामन्यांत शतक झळकावणारा विदर्भाचा (अकोल्याचा) अथर्व तायडे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अपेक्षेपेक्षा अधिक सरस कामगिरी करून त्यांनी पहिली कसोटी जिंकलीही आणि दुसऱ्यातही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. अथर्व हा मुळचा अकोल्याचा. जानेवारीत झालेल्या कूचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत ट्रिपल सेंच्युरी झळकावून अथर्व (३१३) प्रसिद्धीझोतात आला. श्रीलंका दौऱ्यावरील पहिल्या लढतीत ११३ धावा कुटणाऱ्या अथर्वने मंगळवारी दुसऱ्या सामन्यात १७७ धावांची तुफानी खेळी केली. या सलामीवीराने १७२ चेंडूत २० चौकार आणि ३ षटकार खेचले. १४ वर्षांचा असताना अथर्व माझ्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी आला होता. जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत घेण्याची तयारी, यामुळेच तो एक एक टप्पा सर करत गेला. राष्ट्रीय स्पर्धेतील एका सामन्यात त्याने ९० षटके खेळून काढली आणि फक्त ८० धावा केल्या. तो एक फरफेक्ट बॅट्समन असून पुढील मोसमात तो रणजी स्पर्धेत पदार्पण करेल, असा विश्वास त्याने र्निमाण केलाय. आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया अथर्वचे प्रशिक्षक उस्मान यांनी दिलीय. Mumbai Band LIVE :नवी मुंबईत आंदोलनाचा भडका, पोलिसांची दोन वाहनं जाळली या खेळीने त्याला थेट भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंग याच्या बाजूला बसवले. १९ वर्षांखालील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत तिहेरी शतक झळकावणारा युवराज ( ३५८; १९९९) नंतरचा तो दुसरा खेळाडू ठरलाय. त्याच्या या कामगिरीमुळे अर्जुन तेंडुलकरची चर्चा असली तरी भाव मात्र अकोल्याच्या अर्थवने खाल्लाय. हेही वाचा.. पहाटे तीनपर्यंत काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोण हटवणार - चंद्रकांत पाटील दिवसभरात ‘या’ ठिकाणी पेटलं मराठा आंदोलन नागपूरच्या पाण्यामुळे विखे पाटलांना डेंग्यूची लागण

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: akola
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात