संदिप राजगोळकर, कोल्हापूर,ता.25 जुलै : मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेचं वृत्त मंत्रिमंडळाले क्रमांक दोनचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावलंय. पहाटे तीनपर्यंत जागून काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोण हटवणार असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली असं वक्तव्य शिवसनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्याला चंद्रकांत पाटील यांनी हे उत्तर दिलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हे माझं काम नाही तर बांधिलकी आहे असंही ते म्हणाले. आंदोलनाविषयी मी काहीही चुकीचं बोललो नसून वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो असही त्यांनी स्पष्ट केलं.
VIDEO : मुख्यमंत्री बदलाची महाराष्ट्रात चर्चा? शिवसेनेने केलं फडणवीसांना टार्गेट
चर्चेला तयार!,तीन दिवसांनंतर मुख्यमंत्री मराठा मोर्च्यावर बोलले
काय म्हणाले संजय राऊत महाराष्ट्र जळत असताना सरकारचं अस्तित्व जाणवत नाही. सरकारने पळपुटी भूमिका घेतली असून सकार अस्थिर झालंय अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सरकारने आंदोलकांशी चर्चा करावी अशी मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री बदलाची महाराष्ट्रात चर्चा सुरू झालेली चर्चा ही इतर ठिकानी नाही तर भाजपमध्ये सुरू झाली असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं.शिवसेना भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. मुख्यमंत्री कोंडीत कसे पकडले जातील याची शिवसेनेकडून काळजी घेतली जाते. राज्यात आंदोलन पेटलेलं असताना राऊत यांनी मुख्यमंत्री बदलाबद्दल केलेलं वक्तव्य हे संशय निर्माण करण्यासाठीच केलं गेलं अशी प्रक्रिया भाजपने व्यक्त केली आहे.