नागपूर अधिवेशनाच्या काळात विखे पाटलांना डेंग्यूची लागण

विखे पाटील यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे. डाॅक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2018 07:02 PM IST

नागपूर अधिवेशनाच्या काळात विखे पाटलांना डेंग्यूची लागण

मुंबई, 25 जुलै : नागपूरमध्ये पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन भरवण्यात आले खरे पण नागपुरात पावसाने घातलेल्या धुमशानामुळे अधिवेशन चांगलेच गाजले. आता तर अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना डेंग्यूची लागण झाल्याची बाबसमोर आली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे.

विधिमंडळाच्या इतिहासात पावसाळी अधिवेशन चार जुलैपासून नागपुरात भरवण्यात आलं होतं.  मुंबईत आमदार निवासाचे काम सुरू असल्यामुळे तब्बल ४७ वर्षांनी राज्याची उपराजधानी नागपुरात पावसाळी अधिवेशन झालं. पण तिसऱ्याच दिवशी नागपुरात पावसाने हाहाकार घातला. अधिवेशनातही पाणी साचल्यामुळे सत्ताधाऱ्यांसहच विरोधकांचीही त्रेधातिरपट उडाली होती. सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत अधिवेशनात पोहोचावे लागले होते.

Loading...

  पहाटे तीनपर्यंत काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोण हटवणार - चंद्रकांत पाटील

उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची पाण्यातून वाट काढताना चांगलीच कसरत करावी लागली  आणि त्यांची ही कसरत टीपण्याची संधी फोटोग्राफरनं सोडली नाही.तिकडे पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीतून विरोधी पक्षाचे नेते ही सगळी गंमत पाहत होते. तर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते एका छोटेखानी लॉनवर अडकले होते. विधानभवनाचं तळघर पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं वीजपुरवठा बंद करावा लागला. सगळ्या मंत्र्यांच्या कक्षात अंधार पसरला. एकनाथ खडसेंच्या कक्षात मेणबत्ती मिणमिणतेय समजल्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी त्या दालनाचा आसरा घेतला.

चर्चेला तयार!,तीन दिवसांनंतर मुख्यमंत्री मराठा मोर्च्यावर बोलले

पाण्याचा निचरा करण्यासाठी जेव्हा सफाई कर्मचारी विधानभवन परिसरातल्या नाल्यात उतरले तेव्हा त्यांच्या हाती लागलेली गोष्ट पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.कारण नाल्यातून चक्क दारूच्या बाटल्या आढळून आल्या. आता हा कोणत्या तळीरामाचा प्रताप असा सवाल विरोधक विचारताहेत.

ठाण्यात आंदोलकांवर पोलिसांनी झाडल्या नळकांड्या, पहा हा LIVE व्हिडिओ

आता नागपूर पावसाळी अधिवेशनादरम्यान साचलेल्या पाण्यामुळे विरोधीपक्ष नेते विखे पाटील यांना डेंग्यूची लागण झाल्याची बाबसमोर आलीये. विखे पाटील यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे. डाॅक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून विखे पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी उपचारादरम्यान सक्तीची विश्रांती घेण्याचा तसंच सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मी पूर्वनियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाही असं विखे पाटील यांनी टि्वट करून सांगितलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2018 05:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...