कराची, 24 फेब्रुवारी : भारत-पाक यांच्यातीच संबंध साऱ्या जगाला माहित आहेत. या दोन्ही देशांतील राजकिय संबंधांचा फटका क्रिकेटला सगळ्यात जास्त बसला आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या दोन्ही देशांमध्ये एकही सामना झालेला नाही. तसेच, या दोन्ही देशात यापुढे काही सामने होतील, असे वाटतंही नाही. दरम्यान माजी क्रिकेटपटूनं भारत-पाक सामना न होण्याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोषी ठरवले आहे. दोन्ही देशांमधील शेवटची मालिका 2012-13 मध्ये खेळली गेली होती. त्यानंतर पाकिस्तान संघ तीन वनडे मालिका खेळण्यासाठी भारतात आला. दोन्ही संघांचा शेवटचा कसोटी सामना 13 वर्षांपूर्वी 2007 मध्ये खेळला गेला होता.पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांची टीका करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तानी माध्यमात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार आफ्रिदी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, “भारताशी बिघडत चाललेल्या संबंधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा हात आहे आणि जोपर्यंत ते सत्तेत आहेत तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार नाही”. मोदींवर टीका करत आफ्रिदीनं भारत-पाक क्रिकेट सामने होणे गरजेचे आहे, असेही सांगितले. वाचा- कसोटी वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला पराभ, गुणतालिकेत झाले मोठे बदल पाकिस्तान सुपर लीग (PSL) पूर्णपणे पाकिस्तानमध्ये आयोजित केल्याबद्दल शाहिद आफ्रिदी यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) आभार मानले. तसेच, क्रिकेट पाकिस्तानमध्ये परत येईल. आम्हाला खात्री आहे की ते परत येईल, असा विश्वासही व्यक्त केला. वाचा- विराटपासून अश्विनपर्यंत सर्व झाले फेल! ही आहेत भारताच्या पराभवाची प्रमुख 5 कारणे शोएब अख्तरनं केली होती भारतावर टीका शोएबनं दोन्ही देशांतील परिस्थितीवर भाष्य करत, दोन्ही देश एकमेकांचे कांदे-बटाटे खातात, व्यवहार करत मग क्रिकेट खेळायला काय हरकत आहे. आपल्या यु-ट्युब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड करत शोएबनं टीका केली आहे. शोएबनं यावेळी भारत-पाक यांच्यात तिसऱ्या देशात तरी सामने व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. सध्या भारताचा कबड्डी संघ पाकिस्तानमध्ये आहे. त्यांचे जंगी स्वागतही करण्यात आले. एवढेच नाही तर भारतात होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी पाक संघाला भारत सरकारने व्हिसाही दिला आहे. टेनिसमधील डेव्हिस कपमध्येही हे संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. मात्र भारत-पाक यांच्यात केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये क्रिकेट सामने होतात. वाचा- विराट, धोनी नाही तर ‘या’ खेळाडूमुळे टीम इंडियाला मिळाला बुमराह! पाहुणचारात पाकिस्तान अव्वल पाहुणचारांच्या बाबतीत शोएबने पाकिस्तानला जगातील सर्वोत्तम देश म्हणून वर्णन केले. म्हणाले, “विरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली किंवा सचिन तेंडुलकर यांना विचारा. आम्ही किती छान पाहुणचार करतो. तेथे जे काही फरक असू शकतात परंतु यामुळे क्रिकेटचे नुकसान होऊ नये. भारत-पाकिस्तान लवकरच द्विपक्षीय मालिका खेळेल अशी माझी अपेक्षा आहे. यासाठी तटस्थ ठिकाण निवडले जाऊ शकते", असे सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.