विराट, धोनी नाही तर ‘या’ खेळाडूमुळे टीम इंडियाला मिळाला बुमराह! यॉर्कर किंगने पहिल्यांदाच केला खुलासा

भारतीय संघाचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीनंतर कमबॅक करत आहे. सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या बुमराहला विशेष चांगली कामगिरी करता आलेली नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : भारतीय संघाचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीनंतर कमबॅक करत आहे. सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या बुमराहला विशेष चांगली कामगिरी करता आलेली नाही. या दरम्यान बुमराहनं एका मुलाखतीत कोणामुळं टीम इंडियात संधी मिळाली याबाबत खुलासा केला आहे. बुमराहनं एका मुलाखतीत सांगितले की, “एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी धोनीमुळं मिळाली. पण करिअरचे श्रेय टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक जॉन राइट यांना जाते”. जसप्रीत बुमराह सध्या नंबर-2चा गोलंदाज आहे.

वाचा-भारताचा पराभव निश्चित की विराटसेना पुन्हा रचणार 20 वर्षांपूर्वीचा इतिहास?

करियर बनविण्यात जॉन राइटचे योगदान

जसप्रीत बुमराह यावेळी आपल्या करिअरचे श्रेय टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक जॉन राइट यांना दिले. बुमराहने सांगितले की, “माझ्या करिअरमध्ये जॉन राइटचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मी त्यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. मुंबईविरुद्ध सय्यद मुश्ताक अली सामना खेळत असताना जॉन राइट यांची नजर माझ्यावर गेली आणि माझे करिअर बदलले”. एवढेच नाही तर, “जॉन राइटने माझ्यावर तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्याचा आग्रह धरला. जॉन राईटची प्रतिभा समजून घेण्याची कला आहे. मुंबई इंडियन्सचे अनेक खेळाडू भारताकडून खेळले आहेत. मी आजही जॉन राईटशी बोलतो”, असेही सांगितले आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याआधी बुमराह आयपीएल आणि स्थानिक क्रिकेट खेळत होता. त्यानंतर 2016मध्ये एकदिवसीय तर 2018मध्ये कसोटी संघात पदार्पण केले.

वाचा-दिग्गज क्रिकेटपटूच्या घरात एका आठवडा राहण्यासाठी मोजावे लागतील इतके पैसे!

बुमराहने धोनीला दिले करिअरचे श्रेय

क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत बुमराहनं, 'सिडनी एकदिवसीय आणि केप टाउन कसोटी दोन्ही माझ्यासाठी खूप खास आहेत. बरीच मेहनत घेतल्यानंतर मला टीम इंडियामध्ये संधी मिळाली. ज्या दिवशी मी संघासोबत पोहचलो तिथे सराव होता, परंतु पावसामुळे तो रद्द झाला. तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की की मी खेळणार नाही, कारण मला काय काय करावे, हे माहित नव्हते’, असे सांगितले. तर, “दुसर्‍या दिवशी जेव्हा मी टीमच्या बैठकीला गेलो होतो, तेव्हा मुख्य संचालक रवी शास्त्री यांनी, म्हणाले, तुम्ही तयार आहात, आज खेळालं. हे ऐकून मला भीती वाटली. मला वाटलं की कोणीतरी येऊन मला सांगेल, पण कोणीही आले नाही. मात्र त्यानंतर, मी गोलंदाजी करण्याआधी महेंद्रसिंग धोनी माझ्याकडे आले आणि म्हणाले की सामन्याचा आनंद घे. ते शब्द ऐकून माझ्यात हिम्मत आली”, असे बुमराहनं सांगितले.

वाचा-भारत-न्यूझीलंड live सामन्यावेळी स्टेडियममध्ये अचानक दिसला ख्रिस गेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2020 10:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading