जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ : विराटपासून अश्विनपर्यंत सर्व झाले फेल! ही आहेत भारताच्या पराभवाची प्रमुख 5 कारणे

IND vs NZ : विराटपासून अश्विनपर्यंत सर्व झाले फेल! ही आहेत भारताच्या पराभवाची प्रमुख 5 कारणे

IND vs NZ : विराटपासून अश्विनपर्यंत सर्व झाले फेल! ही आहेत भारताच्या पराभवाची प्रमुख 5 कारणे

भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं फलंदाजी, गोलंदाजी ते क्षेत्ररक्षणापर्यंत सुमार कामगिरी केली. परिणामी, न्यूझीलंडनं 10 विकेटनं हा सामना जिंकला.

  • -MIN READ
  • Last Updated :

वेलिंग्टन, 24 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं फलंदाजी, गोलंदाजी ते क्षेत्ररक्षणापर्यंत सुमार कामगिरी केली. परिणामी, न्यूझीलंडनं 10 विकेटनं हा सामना जिंकला. या पराभामुळं विराटसेनेच्या विजयी घौडदौड थांबली. सलग सात सामने जिंकल्यानंतर पहिला पराभव सहन करावा लागला. भारताच्या पराभवामागे आहेत ही प्रमुख चार कारणे. टॉस हरल्याचा फटका भारतीय कर्णधार टॉसच्या बाबतीत नशीबवान नाही आहे. टॉस गमावल्यामुळे भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. कर्णधार म्हणून हा विराट कोहलीचा 11वा पराभव आहे आणि प्रत्येक सामन्यात विराट टॉस गमावल्यानंतर सामना गमावतो. चार दिवसातील एकाही डावात भारताला चांगली खेळी करता आली नाही. पहिल्या दिवशीच्या सत्रात खेळपट्टीवर असलेल्या ओलसरपणामुळे भारतीय फलंदाजांना नांगी टाकली. त्यांना केवळ 163 धावा केल्या. दुसर्‍या डावात टीम इंडियाने केवळ 47 धावांत 6 गडी गमावले. सलामीवीरांचा फ्लॉप शो एकदिवसीय मालिकेप्रमाणे कसोटीमध्येही मयंक आणि पृथ्वी शॉ यांची जोडी चांगली कामगिरी करू शकली नाही. पहिल्या डावात या दोघांनी 16 धावांची भागीदारी केली तर दुसऱ्या डावात 27 धावांची. दुसऱ्या डावात मयंकने अर्धशतकी खेळी करत भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र शॉला चांगली कामगिरी करता आली नाही. टीम साउदी-बोल्टसमोर शरणागती टीम फलंदाजांनी टीम साऊथी-बोल्ट जोडीसमोर आपले हात ठेवले. सौदी आणि बोल्टने 20 पैकी 14 गडी बाद केले. वेगवान गोलंदाजांविरुद्ध चांगली फलंदाजी करणारे भारतीय फलंदाजांनी या गोलंदाजांच्या स्विंगसमोर नांगी टाकली. न्यूझीलंडचा हा 100वा कसोटी विजय आहे. यापैकी हे दोन्ही गोलंदाज एकत्र खेळताना न्यूझीलंडने 28 वेळा विजय मिळवला आहे. स्टार फलंदाजांची सुमार कामगिरी भारताचा कसोटी संघ हा विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर जास्त निर्भर आहे. मात्र या कसोटी सामन्यात दोन्ही फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. कोहलीनं पहिल्या डावात 2 तर दुसऱ्या डावात 19 धावा केल्या. तर, पुजारानं दोन्ही डावात 11 धावा करत बाद झाला. आर अश्विनकडून अपेक्षा अश्विनला कसोटीतील महत्त्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू मानले जाते. पण दोन्ही गोलंदाजी आणि फलंदाजी करताना तो फ्लॉप ठरला. तथापि, पहिल्या कसोटीत तो फलंदाजीला प्रभावित करण्यास अपयशी ठरला. त्याला पहिल्या डावात शून्य आणि दुसऱ्या डावात फक्त चार धावा करता आल्या. अश्विनला अवघ्या 3 गडी बाद केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात