कराची, 15 सप्टेंबर : पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीनं गेल्या काही दिवसात काश्मीरच्या मुद्द्यावर अनेक वादग्रस्त विधान केले आहेत. याच बरोबर आफ्रिदीनं पाकिस्तान अधिकृत काश्मीर (Pakistan Occupied Kashmir)परिसरात दौरा केला आहे. काही दिवसांपूर्वी आफ्रिदी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानसोबत एका रॅलीमध्ये दिसले होते. याआधी आफ्रिदी पाकिस्तान सेनेचे मेजर जनरल आसिफ गफूरलाही(Major General Asif Gafoor) भेटला होता. सोशल मीडियावरही आफ्रिदीचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत असतात. 13 सप्टेंबरला मुजफ्फराबादमध्ये झालेल्या रॅली दरम्यान कश्मीरमध्ये भारताविरोधात वादग्रस्त विधान केले होते. मात्र गफूरसोबत आफ्रिदीचा फोटो व्हारयल झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये आफ्रिदीला पंतप्रधान करा, अशी मागणी जोर धरत होती.
वाचा- धोनीच्या पत्नीच्या HOT फोटोंमुळे धिंगाणा, बेबीपासून लव्ह यूपर्यंत कमेंट्स! गफूर आणि आफ्रिदीचा फोटो व्हायरल गफूर आणि आफ्रिदी यांच्या फोटोवर ट्वीटरवर आफ्रिदीला पंतप्रधान व्हायचे आहे, अशा कमेंट्स येत होत्या. त्याचबरोबर काहींनी आफ्रिदीच्या विरोधातही कमेंट केल्या होत्या. एका चाहत्यानं तर आफ्रिदी पंतप्रधान झाला तर पाकिस्तानमध्ये असलेला काश्मीरचा भागही तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना देईल अशी प्रतिक्रिया दिली होती.
Aager ye PM bun gia to lss ne Azad Kashmir bhi Modi K munh per de marna hay.
— maqsood-ur-Rahman (@Arshad63700789d) September 15, 2019
आफ्रिदीचे वादग्रस्त ट्वीट अफ्रिदीनं बॉर्डरवर जात काश्मीरमधल्या नागरिकांसाठी काम करणार असल्याचे ट्वीट केले होते. आफ्रिदीनं पाकिस्तानी जनतेला, “पंतप्रधान इमरान यांनी सुरू केलेल्या ‘काश्मीर तास’ या कार्यक्रमाशी जोडले जाण्याची विनंती केली होती. आफ्रिदीनं याबाबत आपण पीओके आणि बॉर्डरवर उपस्थित राहणार आहे”, असे ट्वीट केले. वाचा- पावसामुळं चाहत्यांचा रविवार गेला वाया, पहिला टी-20 सामना रद्द! जावेद मियांदादची मुक्ताफळे पाकिस्तानी चॅनलनं काश्मीर मुद्द्यावर प्रश्न विचारले असता, “तुमच्याकडे जर सामग्री आहे तर, तुम्ही हल्ला केला पाहिजे. प्रत्येकवेळी नियम तुमच्या मदतीला येणार नाही. जेव्हा त्यांचे शव घरी जातील, तेव्हा त्यांना अक्कल येईल”, अशी मुक्ताफळे उधळली. तसेच, जेव्हा मियादांद यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय सल्ला देणार असे विचारले असता, “मी आधीही सांगितले आहे, भारत एक भित्रा देश आहे. त्यांनी आतापर्यंत केले काय आहे. अणुअस्त्र आम्ही असेच नाही ठेवले आहेत. एक संधी आणि भारत पूर्ण साफ करून देईल”, असे भडकाऊ विधान केले होते. वाचा- पंत तुझा पत्ता कट होणार, कारण माझा आवडता खेळाडू तयार; ऋषभला ‘गंभीर’ इशारा पाकिस्तान खेळाडूंचे वादग्रस्त विधान जावेद मियादांद यांच्या आधी पाकचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं संयुक्त राष्ट्रसंघाने या प्रकरणी लक्ष घालावं असं म्हटलं होतं. त्यानंतर पाकिस्तानी संघाचा कर्णधार सर्फराज अहमदनेही प्रतिक्रिया दिली होती. ईद साजरी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सर्फराज म्हणाला की, मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की या कठीण काळात आमच्या काश्मीरी बांधवांची मदत कर. तर, रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरनंही यावरून ट्वीट केलं आहे. त्यानं दुखापत झालेल्या लहान मुलाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यानं म्हटंल आहे की, बलिदानाचा अर्थ तुम्ही सांगितलात, तुमच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हणत त्यानं ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाचा- लाईव्ह सामन्यात झाली मोठी गडबड! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असा प्रकार VIDEO: भाजप प्रवेशानंतर उदयनराजेंनी पवारांवर केली टीका, ‘अभिमान आहे पण…. ‘