LIVE सामन्यात झाली मोठी गडबड! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असा प्रकार

LIVE सामन्यात झाली मोठी गडबड! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असा प्रकार

पहिल्या चार चेंडूतच पंचांनी लाईव्ह सामना थांबवला.

  • Share this:

बारबाडोस, 15 सप्टेंबर : क्रिकेटच्या मैदानावर अनेकवेळा खेळाडूंच्या किंवा पंचाच्या चुकांमुळे सामना थांबवले जातात. असा एक प्रकार ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (Australia Women vs West Indies Women) यांच्यातील टी-20 सामन्यात घडला. बारबाडोसच्या मैदानावर खेळला गेलेल्या या टी-20 सामन्यात क्रिकेटच्या इतिहासातली एक मोठी चूक झाली. त्यामुळं चार चेंडूंनंतर हा सामना थांबवण्यात आला.

काय होतं प्रकरण?

महिला संघाच्या सामन्यात 30 ऐवजी 25 यार्ड्सचे मैदान तयार करण्यात आले होते. मैदानावर फक्त 25 यॉर्ड्सच्या लाईन मारण्यात आल्या होत्या. ऑस्ट्रेलियाची जलद गोलंदाज मेगन गूट(Megan Schutt) ने केवळ चार चेंडू टाकले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची ऑलराऊंडर खेळाडू जेस जोनासेन हिनं पंचांना मैदान 25 यॉर्ड्स असल्याचे सांगितले. त्यानंतर मैदानावर ग्राऊंडमॅन बोलवण्यात आले. त्यामुळं सामना बराच काळ थांबवण्यात आला.

वाचा-पावसामुळं चाहत्यांचा रविवार गेला वाया, पहिला टी-20 सामना रद्द!

ऑस्ट्रेलिया संघाचा विजय

ग्राऊंडवरची गडबड सुधारल्यानंतर ऑस्ट्रेलियानं शानदार खेळी करत 20 ओव्हकमध्ये वेस्ट इंडिजला 106 धावांवर रोखले. हे लक्ष ऑस्ट्रेलियानं 18.5 ओव्हरमध्ये पूर्ण केले. यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लैर्निंगनं 54 धावांची अर्धशतकी खेळी केली.

वाचा-पंत तुझा पत्ता कट होणार, कारण माझा आवडता खेळाडू तयार; ऋषभला 'गंभीर' इशारा

रन आऊटमध्येही झाला घोळ

या सामन्यात अनेक वादग्रस्त प्रकार घडले. सामन्यादरम्यान एका रन आऊटमुळं वादंग निर्माण झाला. तिसऱ्या ओव्हरमध्ये स्टेसी किंगनं अॅरिन बर्न्सनं रन आऊट केले होते. मात्र पंचांनी फलंदाजाला आऊट दिले नाही. त्यानंतर गोलंदाजानं तिसऱ्या पंचांकडे निर्णयाची मागणी केली. त्यानंतर फलंदाज अॅरिन बर्न्सला बाद घोषित करण्यात आले.

वाचा-भारताचा नवा बॅडमिंटन स्टार, 18 वर्षीय लक्ष्यने पटकावलं विजेतेपद

VIDEO: महाजनादेश यात्रेत शिवेंद्रराजे भडकले; म्हणाले, 'आम्ही तुकड्यावर जगणारे नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 08:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...