धर्मशाला, 15 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला टी-20 सामना धर्मशाला मैदानावर होणार होता. मात्र पावसामुळं एकही चेंडू न खेळता हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळं आता 18 सप्टेंबरला, बुधवारी मोहाली येथे दुसरा सामना खेळण्यात येणार आहे. पाऊस अजूनही कायम असल्यामुळं सामना न खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, ही मालिका पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. मात्र, पहिल्याच सामन्यावर पावसाचा धोका आहे. गेल्या काही दिवसात धर्मशाला परिसरात मुसळधार पाऊस आहे. दरम्यान रविवार दुपारपर्यंत मुसळधार पावसाच्या सरींमुळं आजचा सामना होणार की नाही, याबाबत साशंकता आहे.
The rains continue and the match has officially been called off. See you in Chandigarh for the 2nd T20I #INDvSA pic.twitter.com/BjZ9Y7QAf2
— BCCI (@BCCI) September 15, 2019
असे आहे टी-20 सामन्यांचे वेळापत्रक
पहिला टी20 सामना 15 सप्टेंबर, धर्मशाला
दुसरा टी20 सामना 18 सप्टेंबर, मोहाली
तिसरा टी20 सामना, 22 सप्टेंबर, बेंगळुरू
(सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होतील.)
चार वर्षांपूर्वीच्या पराभवाचा काढणार वचपा
तब्बल चार वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधात भारतीय संघ भिडणार आहे. 2015मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका खेळवण्यात आली होती, तेव्हा भारतीय संघाला मायदेशात 2-0नं पराभव सहन करावा लागला होता. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. टी20 आणि कसोटीसाठी भारताचा कर्णधार म्हणून कोहलीच असणार आहे तर दक्षिण आफ्रिका मात्र दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर कसोटीसाठी फाफ डुप्लेसीकडे कर्णधारपद असणार आहे. आफ्रिकेच्या संघासाठी ही मालिका महत्वाची आहे. वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या या संघाला भारत दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं आव्हान असणार आहे. दुसरीकडं भारतानं विंड़ीजविरुद्ध निर्विवाद यश मिळवलं आहे. यशाची ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.
टी 20 साठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी.
काही कळण्याआधीच कोसळली वीज, पाहा LIVE VIDEO