पंत तुझा पत्ता कट होणार, कारण माझा आवडता खेळाडू तयार; ऋषभला 'गंभीर' इशारा

पंत तुझा पत्ता कट होणार, कारण माझा आवडता खेळाडू तयार; ऋषभला 'गंभीर' इशारा

वर्ल्ड कपनंतर आतापर्यंत ऋषभ पंतला चांगली कामगिरी करता आलेली नाही.

  • Share this:

धर्मशाला, 15 सप्टेंबर : भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतला धोनीचा उत्तराधिकारी म्हणून ओळखले जात आहे. मात्र ऋषभ पंतचा सध्याचा फॉर्म पाहता त्याचा पत्ता कधीही कट होऊ शकतो, असे चिन्ह दिसत आहे. यासाठी आता माजी खेळाडू गौतम गंभीरनं पंतला थेट इशारा दिला आहे.

गंभीरच्या मते, ऋषभ पंतला खुप संधी मिळाल्या आहेत, त्यामुळं आता एक संधी संजू सॅमसनला देण्याची गरज आहे. टाईम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलेल्या लेखात गंभीरनं, "जर भविष्यात ऋषभ पंत चांगली कामगिर करू शकला नाही तर संजू सॅमसनला संधी देण्यास हरकत नाही. पंत शानदार आहे पण सॅमसनला एका संधीची गरज आहे, तो नक्कीच चांगली कामगिरी करू शकतो", असे मत व्यक्त केले.

सॅमसननं इंडिया-अ संघासाठी केली चांगली कामगिरी

संजू सॅमसनला टीम इंडियात आतापर्यंत संधी मिळालेली नाही. मात्र दक्षिण आफ्रिका अ संघाविरोधात त्यानं चांगली कामगिरी केली. दक्षिण आफ्रिका अ संघाविरोधात झालेल्या अखेरच्या दोन सामन्यात त्याला संघात स्थान मिळाले होते. पहिल्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही, मात्र अखेरच्या सामन्यात 48 चेंडूत सॅमसननं 91 धावा केल्या. त्यामुळं त्याला सामानावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

वाचा-क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर, Jioवर मोफत पाहू शकता India-South Africa T20 सामना

Loading...

पंतची खराब खेळी अडचणीची

वर्ल्ड कपमध्ये शिखर धवन बाहेर पडल्यानंतर पंतला संघात स्थान मिळाले, मात्र त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. पंतनं 4 सामन्यात 29च्या सरासरीनं 116 धावा केल्या. तर वेस्ट इंडिज दौऱ्यात 2 एकदिवसीय सामन्यात केवळ 20 धावा केल्या. खराब शॉटमुळं पंतवर अनेक दिग्गज खेळाडूंनी टीकाही केली. त्यामुळं त्याला संघात जागा देण्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. आक्रमक फलंदाज म्हणून पंतची ओळख असली तरी, सामना जिंकून देण्यासाठी त्यानं चांगली कामगिरी अद्याप केलेली नाही. तरी त्याला दक्षिण आफ्रिका विरोधात संघात स्थान देण्यात आले आहे.

वाचा-एक खेळाडू डिप्रेशनमध्ये, पाकविरुद्ध ऑस्ट्रेलियाचे तीनच फलंदाज खेळणार

इशान किशनही घेऊ शकतो पंतची जागा

फक्त संजू सॅमसनच नाही तर पंतची जागा घेण्यासाठी आयपीएल गाजवणारा एक खेळाडू तयार आहे. हा खेळाडू आहे इशान किशन. दक्षिण आफ्रिक अ संघाविरोधात इशाननं 3 एकदिवसीय सामन्यात 37, 55 आणि 40 अशा खेळी केल्या होत्या. भारतानं दुसरा एकदिवसीय सामना इशान किशनमुळं जिंकला. या सामन्यात इशाननं केवळ 24 चेंडूत 55 धावा केल्या होत्या.

वाचा-निवृत्तीच्या निर्णयातून U-टर्न घेणारा अंबाती रायडु झाला कर्णधार!

VIDEO: महाजनादेश यात्रेत शिवेंद्रराजे भडकले; म्हणाले, 'आम्ही तुकड्यावर जगणारे नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 07:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...