मुंबई, 4 एप्रिल: आयपीएलच्या 15 मोसमाची (IPL 2022) सुरुवात चांगली झाली आहे. मोसमाची मॅचदरम्यानचे अनेक किस्से, मजेशीर व्हिडीओ समोर येऊ लागले आहेत. तर काही खेळाडू थिरकताना दिसतात. अशातच दिल्लीचा ओपनर टिम सीफर्ट (Team Seifert) हा अक्षर पटेलकडून ‘बल्ब उतारो या गाण्यावरील डान्स शिकताना दिसला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) इंस्टाग्राम आकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये टिम सीफर्ट डोनर या चित्रपटातील ‘बल्ब उतारो’ डान्स स्टेप करताना दिसला आणि त्याला अक्षर पटेल डान्स शिकवताना दिसला. IPL 2022 : सलग 3 पराभवानंतर CSK अडचणीत, कॅप्टन जडेजानं सांगितला सर्वात मोठ्या दुखण्यावर उपाय ‘सीफर्टची बॅटरी चार्ज असते. दिल्लीमध्ये समाविष्ट होण्याची प्रक्रिया पूर्ण’. अशे मजेशीर कॅप्शनही दिल्लीच्या संघाने व्हिडीओला दिले आहे.
हा व्हिडीओ गुजरातविरुद्धच्या मॅचपूर्वीचा आहे. दिल्ली संघ मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी नव्या सलामीवीर जोडीसह उतरला आहे. पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉसोबत टिम सीफर्टने डावाची सुरुवात केली होती. मात्र टिम सीफर्ट या सामन्यात मोठी खेळी खेळू शकला नाही, तो 14 चेंडूत 21 धावा करुन बाद झाला. त्याचा झेल कायरन पोलार्डने घेतला जो खुप चर्चेत राहिला. त्यानंतर आता त्याचा व्हिडीओ सुद्धा चर्चेत आहे. दिल्लीचा दूसरा सामना गुजरातविरुद्ध झाला, ज्यामध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात संघातील खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. Virushka ची नेटवर्थ थक्क करणारी! विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघांची मिळून अब्जावधींची आहे संपत्ती शुभमन गीलने 6 चौकारांच्या आणि 4 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 84 धावा केल्या, तर हार्दिकने 31 धावा केल्या. गुजरातने दिल्लीसमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात आव्हानाचा बचाव करताना लाॅकी फर्ग्युसनने 28 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. दिल्ली संघ लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकातच १५७ धावांवरच सर्वबाद झाला आणि हा सामना गुजरातने 14धावांनी जिंकला.

)







