Virushka ची नेटवर्थ थक्क करणारी! विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघांची मिळून अब्जावधींची आहे संपत्ती
Virushka ची नेटवर्थ थक्क करणारी! विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघांची मिळून अब्जावधींची आहे संपत्ती
Virat Kohli
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Anushka Sharma and Virat Kohli) हे एक पॉवर कपल मानलं जातं. हे दोघेही भारतातील श्रीमंत सेलेब्रिटींपैकी आहेत. या दोघांची एकूण नेटवर्थ थक्क करणारी आहे. विरुष्काचे एकूण संपत्तीत 1250 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
मुंबई, 03 एप्रिल: अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Anushka Sharma and Virat Kohli) हे एक पॉवर कपल मानलं जातं. हे दोघेही अडचणीच्या काळात नेहमी एकमेकांच्या पाठिशी उभे राहिलेलंही आपण पाहिलं आहे. विराट आणि अनुष्का आपापल्या करिअरमध्ये सध्या यशाच्या शिखरावर आहेत. क्रिकेट पिचवर विराटने आणि कॅमेऱ्यासमोर अनुष्काने त्यांच्या चाहत्यांचं मन नेहमी जिंकलं आहे. हे दोघेही भारतातील श्रीमंत सेलेब्रिटींपैकी आहेत. या दोघांची एकूण नेटवर्थ थक्क करणारी आहे. विरुष्काचे एकूण संपत्तीत 1250 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
विराट कोहली असो वा अनुष्का शर्मा हे दोघेही आज स्वत:च्या मेहनतीवर इथवर पोहोचले आहेत. दोघे ज्या ज्या क्षेत्रात आहेत, त्या क्षेत्रात त्यांच्या कुटुंबीयांपैकी कुणीही नव्हते. अशावेळी त्यांनी कमावलेली संपत्ती कौतुकास्पद आहे.
हे वाचा-कंगनाच्या Lock Upp मध्ये डबल धमाका! जेलमधून बाहेरचा रस्ता दाखवलेले हे कैदी परतले पण...
फोर्ब्स इंडिया 2019 च्या कॅलेंडरमध्ये या कपलचे नाव श्रीमंत कपल म्हणून देखील सर्वोच्च स्थानावर होते. त्यावेळी विराटची संपत्ती 250 कोटी रुपये इतकी होती. श्रीमंत व्यक्तींच्या यादीत विराट पहिल्या यादीत अनुष्का त्यावेळी 21 व्या स्थानावर होती. मीडिया अहवालानुसार सध्या विराटची संपत्ती 900 कोटी आहे. या दोघांची मिळून एकूण नेटवर्थ 1200 कोटींइतकी असल्याची माहिती मीडिया अहवालातून समोर आली आहे. विराट-अनुष्काच्या राहत्या घराची किंमत 34 कोटी रुपये आहे. जागरणने याविषयी वृत्त दिले आहे.
हे वाचा-अनुष्काच्या Look वर विराट कोहली क्लीन बोल्ड, पत्नीला एकटक बघतच राहिला खेळाडू
विराट अनुष्काचे दिल्लीतही आलिशान घर आहे. शिवाय या सेलेब्रिटी कपलला शानदार गाड्यांचीही आवड आहे. त्यांच्या ताफ्यात अनेक महागड्या कार्स आहेत. अभिनयाव्यतिरिक्त अनुष्का शर्माचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. सध्या तिने या प्रोडक्शन हाऊसची सर्व सूत्र तिचा भाऊ कर्णेश शर्मा याच्याकडे सोपवली असली तरी अनेक सिनेमा आणि वेबसीरिजची तिने निर्मिती देखील केली आहे. आयबीटाइम्समधील दाव्यानुसार, वरील सर्व गोष्टी लक्षात घेता या कपलची नेटवर्थ 12 अब्ज रुपये एवढी आहे.
अनुष्का शर्माने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले होते. यामध्ये ती पती विराटसोबत जबरदस्त लुकमध्ये दिसून येत आहे. अनुष्का शर्माची किलर स्टाईल पाहून विराट कोहलीसुद्धा थक्क झाला आहे. पत्नीच्या चेहऱ्यावरून नजर हटवणं त्याला कठीण झालं आहे.हे फोटो शेअर करत अनुष्काने छान कॅप्शनसुद्धा लिहिलं आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.