मुंबई, 3 मे: इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) राजस्थान रॉयल्सचा (RR) पराभव केला. कोलकात्याच्या सलग पराभवानंतर हा विजय निश्चित झाला आहे. सामना संपण्याच्या जवळ आला असताना, मैदानात वादाचा प्रसंग निर्माण झाला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन(Sanju Samson) पंचांच्या निर्णयावर नाराज होता आणि वारंवार तक्रार करत असल्याचे पाहायला मिळाले. कोलकाता नाईट रायडर्सच्या इनिंगमध्ये सुमारे तीन-चार वेळा असे घडले, जेव्हा अंपायरने वाइड बॉल घोषित केला. अंपायरच्या या निर्णयाने संजू सॅमसन वैतागला. संजूने अंपायरच्या निर्णयावर वारंवार आश्चर्य व्यक्त केले आणि शेवटी अंपायरकडे जाऊन प्रश्न विचारला. राजस्थान रॉयल्ससाठी ट्रेंट बोल्टने डावातील 13वे षटक टाकले. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर श्रेयस अय्यरला मोठा फटका मारायचा होता, पण चेंडू यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या हातात गेला. अंपायरने त्याला आऊट न देता चेंडू वाईड घोषित केला. IPL मुळे फिरले ग्रह, नववी इयत्ता फेल असणारा Rinku Singh करायचा झाडू मारण्याचे काम अखेर संजूने लगेच डीआरएस घेतला. कर्णधार संजू सॅमसनने डीआरएस घेतल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले होते की, शेवटी त्याने अंपायरविरुद्ध डीआरएस का घेतला, पण रिप्ले पाहिल्यावर ट्रेंट बोल्टचा चेंडू अय्यरच्या ग्लोव्हजला लागला होता, त्यामुळे त्याला आऊट देण्यात आले. सर्वातअधिक हे प्रसिद्ध कृष्णाच्या षटकात घडले. 19व्या षटकात रिंकू सिंग फलंदाजी करत असताना षटकातील तिसरा चेंडू वाईड घोषित करण्यात आला. रिंकू सिंग थोडा ऑफ खेळत होता, तेव्हा प्रसिद्ध कृष्णाने त्याच्यापासून दूर फेकलेला चेंडू वाइड गेला. यानंतर षटकातील चौथा चेंडूही वाईड देण्यात आला. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जेव्हा रिंकू सिंग रॅम्प शॉट खेळायला गेला तेव्हा प्रसिद्ध कृष्णाने खेळपट्टीच्या काठावर गोलंदाजी केली. तो वाईड देण्यात आला होता, तर त्याचा आधीचा चेंडूही जवळपास सारखाच होता जो वाइड देण्यात आला नव्हता.
Sanju Samson and Prasidh Krishna are doing unnecessary drama. Those are clear WIDE deliveries!#KKRvRR pic.twitter.com/u58aXqYfbB
— Bhartendu Sharma (@Bhar10duSharma) May 2, 2022
या चेंडूनंतर संजू सॅमसन अंपायरजवळ पोहोचला आणि त्याने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. अंपायरला वारंवार समज देऊन संजू सॅमसन माघारी गेला, त्याचवेळी प्रेक्षकांनी पुन्हा चीटर-चीटरच्या घोषणा दिल्या. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (KKR vs RR) सामन्यात केकेआरचा 7 विकेटने विजय झाला आहे. राजस्थानने दिलेलं 153 रनचं आव्हान केकेआरने 19.1 ओव्हरमध्ये पार केलं. केकेआरला लागोपाठ 5 पराभवांनंतरचा हा पहिला विजय आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना हा विजय मिळवणं गरजेचं होतं. या मोसमात केकेआरने 10 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर 6 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. राजस्थानविरुद्धच्या या विजयासह केकेआर पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर आली आहे.