जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL मुळे फिरले ग्रह, नववी इयत्ता फेल असणारा Rinku Singh करायचा झाडू मारण्याचे काम

IPL मुळे फिरले ग्रह, नववी इयत्ता फेल असणारा Rinku Singh करायचा झाडू मारण्याचे काम

kkr Rinku Singh

kkr Rinku Singh

परिस्थिती अत्यंत गरीब असूनही अनेक खेळाडू क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पाहत असतात. परिस्थितीशी दोन हात करत मेहनतीच्या जीवावर अखेर त्यांचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न देखील पूर्ण होते. असेच काहीचे केकेआरचा राजस्थान विरुद्ध बाजीगर ठरलेल्या रिंकू सिंगबाबतीत(Rinku Singh ) घडले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 एप्रिल: परिस्थिती अत्यंत गरीब असूनही अनेक खेळाडू क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पाहत असतात. परिस्थितीशी दोन हात करत मेहनतीच्या जीवावर अखेर त्यांचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न देखील पूर्ण होते. असेच काहीचे केकेआरचा राजस्थान विरुद्ध बाजीगर ठरलेल्या रिंकू सिंगबाबतीत(Rinku Singh ) घडले. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (KKR vs RR) सामन्यात केकेआरचा 7 विकेटने विजय झाला आहे. राजस्थानने दिलेलं 153 रनचं आव्हान केकेआरने 19.1 ओव्हरमध्ये पार केलं. या विजयात रिंकू सिंहने मोलाचा वाटा उचलला. पण विजय मिळवून देणारा हा रिंकू सिंहने खुप हालकीचे दिवस काढले. पण आयपीएलमुळे नशीब पालटले. अलीगढ येथे 1997 साली रिंकु सिंगचा जन्म झाला. त्य‍ाचे वडील घरोघरी जाऊन सिलेंडरची डिलिव्हरी करण्याचे काम करतात. रिंकूला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्याचा मोठा भाऊ अॅटो रिक्षा चालवतो. तर दुसरा भाऊ कोचिंग सेंटरमध्ये नोकरी करतो. गेले 5 वर्षांपासून शोधत होता ‘ही’ संधी, MOM अवॉर्ड मिळाल्यानंतर KKR च्या बाजीगरचे भावनिक वक्तव्य इयत्ता नववी फेल असलेल्या रिंकू सिंगचे क्रिकेटवर अति प्रेम होते. मात्र घरात आर्थिक तंगी असल्याने त्यालाही कामावर जावे लागले. त्याच्या भावाने त्याला एका कार्यालयात झाडू म‍ारण्याचे काम मिळवून दिले होते. त्यांचे शिक्षण ही जास्त झाले नव्हते. त्यामुळे त्याला असे काम मिळाले. रिंकू सिंगने दिल्लीमध्ये एक क्रिकेट मालिका खेळला. यात त्याला मालिकावीराचा पुरस्कार म्हणून मोटारसायकल देण्यात आली. त्याने ही मोटारसायकल त्याच्या वडिलांना दिली. त्याचे वडील सिलेंडर डिलेव्हरीला सायकल ऐवजी आता मोटारसायकलवर करत आहेत. त्याच्या कुटुंबावर पाच लाखाचे कर्ज देखील होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तो 60 च्या सरासरीने धावा करतो. याच दरम्यान, रिंकू सिंग क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत होता. ‘अ’ दर्जाच्या सामन्यात 2014 साली विदर्भाविरुद्ध खेळताना पदार्पण केले आणि पुढील वर्षी तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळतानाही दिसून आला. तिथेही त्याने लाजवाब कामगिरी केली. रिंकू सिंग उत्तर प्रदेशच्या 19 वर्षाखालील संघाकडून क्रिकेट खेळल्याने जो पैसा यायचा त्याच्यावर त्याचे घर चालायचे. अखेर 2018 साली त्याचे आयुष्य बदलले. आयपीएल 2018 च्या लिलावात रिंकू सिंगला शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने त्याला 80 लाख रुपयांमध्ये खरेदी केले. वास्तविक पाहता 20 लाख रुपये इतकीच त्याची बेस प्राइज होती. या मिळालेल्या पैशातून त्याने आपल्या कुटुंबावर असलेले कर्ज फेडून टाकले तसेच मोठा भाऊ आणि बहीणीच्या लग्नात मदत केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात