मुंबई, 20 एप्रिल: आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG)यांच्याच 31 वा सामना खेळवण्यात आला. या मॅचमध्ये आरसीबीने लखनऊ सुपर जाएंट्सवर 18 रनने विजय मिळवला आहे. या रंगलेल्या सामन्यात सिनेस्टार्सनी हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळाले. आयपीएल 15 व्या सीझनमधील 31 वा सामना पाहण्यासाठी अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रवीना टंडन यांनी उपस्थिती लावली होती.
बंगळुरूच्या डावातील 14व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसने षटकार ठोकला. यानंतर संजय दत्त(Sanjay Dutt ) आणि रवीना टंडन(Raveena tandan) खूप खूश दिसले. यावेळी त्यांनी कॅमेऱ्याकडे पाहून चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या. नुकतंच रिलीज झालेल्या केजीएफ चॅप्टर 2 (KGF 2) या चित्रपटामध्ये दोघे दिसले होते.
...तर आता Virat Kohli ला ब्रेक द्यावा, चिंता व्यक्त करत गुरु शास्त्रींनी दिला सल्ला
कर्णधार फाफ डू प्लेसिस (93) च्या शानदार फलंदाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने IPL 2022 च्या 31 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) समोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले. संघासाठी कर्णधार डु प्लेसिस आणि शजबाज अहमद यांनी 48 चेंडूत 70 धावांची भागीदारी केली. यामध्ये त्याने सिक्सदेखील ठोकली. त्याची ही खेळी पाहून सिनेस्टार्स भलतेच खूश झाले. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Sanjay dutt & @TandonRaveena In 🔴&⚫ colours @RCBTweets @hombalefilms #KGF2 pic.twitter.com/A6omj5qfLm
— Mohan chowdary (@chintu_088) April 19, 2022
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्य दोघांनीही आरसीबीची जर्सी परिधान केली होते. याचा अर्थ दोघे आरसीबीला सपोर्ट करण्यासाठी मैदानात आले होते. सामन्यापूर्वी संघाने दोघांचे फोटो शेअर केले होते.
दोघेही इथे त्यांचा नवा चित्रपट केजीएफच्या प्रमोशनासाठी आले होते. केजीएफ २ मध्ये संजय दत्तने अधीराची भूमिका साकारली आहे. याच नावाने प्रिंट केलेली आरसीबीची जर्सी संजय दत्तने परिधान केली होती. तर या चित्रपटात रवीना टंडनची भूमिका रमिका सेनची आहे.
संजय दत्त आणि KGF-2 चे सदस्य रॉयल चॅलेंजर्स बंगलोर फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यांनाही भेटले.
मंगळवारी झालेल्या या सामन्यात आरसीबीने लखनऊचा 18 धावांनी पराभव केला. त्यामुळे पॉईंट टेबलमध्ये हा संघ दुसऱ्या स्थानी घसरला आहे. आरसीबीने दिलेल्या 182 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 20 ओव्हरमध्ये 163/8 एवढाच स्कोअर करता आला. आरसीबीकडून जॉश हेजलवूडने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर हर्षल पटेलला 2 विकेट मिळाल्या. मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेलला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. लखनऊकडून कृणाल पांड्याने सर्वाधिक 42 रन केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Lucknow Super Giants, RCB, Sanjay dutt