मुंबई, 20 एप्रिल: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. घरच्या मैदानातही त्याचा खेळ पाहायला मिळेना. या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (RCB) प्रतिनिधित्त्व करताना विराट सपशेल फ्लॉप ठरत आहे. मंगळवारी लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात विराटने पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता आपली विकेट गमावली. त्याच्या खेळीमुळे क्रिकेट जगतात अनेक दिग्गजांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. कोहलीच्या करिअरवरुन त्याचे गुरु म्हणजेच, टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भाष्य करत त्याने थोडे दिवस ब्रेक घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
आयपीएल 2022 मधील (IPL 2022) या 31 व्या सामन्यात लखनऊने (LSG vs RCB) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली होती. परिणामी बेंगलोरचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. सलामीवीर अनुज रावतने4 धावांवर विकेट गमावल्यामुळे विराट (Virat Kohli) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. परंतु लखनऊचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराने (Dushmantha Chameera) पहिल्याच चेंडूवर दीपक हुडाच्या हातून त्याला झेलबाद केले. अशाप्रकारे पहिल्याच चेंडूवर एकही धाव न काढता विराट तंबूत परतला.
LSG vs RCB: हिरो ठरतोय झिरो...लखनऊच्या पराभवाला हा मिस्ट्री युवा बॉलर जबाबदार
त्याच्या खराब फॉर्ममुळे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना त्याच्या करिअरबद्दब चिंता वाटू लागली आहे. कोहलीचा मेंदू ब्लॉक होण्यापूर्वी त्यानं ब्रेक घ्यायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
रवी शास्त्री म्हणाले की भारताच्या माजी कर्णधाराकडे अजूनही 6-7 वर्षांचे क्रिकेट शिल्लक आहे आणि व्यवस्थापनाने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांने अचानक कोणताही धक्का देऊ नये. , विशेषत: अशा वेळी जेव्हा बायो-बबल संपत आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी किंवा नंतर कोहलीला बीसीसीआयने ब्रेक द्यावा, असा सल्ला शास्त्री यांनी दिला.
दुष्मंथ चमीराने ऑफ-स्टंपच्या बाहेर एक बॅक-ऑफ-लेन्थ चेंडू टाकला, जो कट करण्याच्या प्रयत्नात विराटने विकेट गमावली. आयपीएलमध्ये 5 वर्षांनंतर पहिल्यांदाच विराट कोहली गोल्डन डकवर बाद झाला. आतापर्यंत तो चार वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे. तर 7 वेळा शून्यावर विकेट गमावली आहे.
क्रिकेटसाठी काळा मंगळवार, एकाच दिवशी 2 क्रिकेटपटूंचं निधन
रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना विराच्या खराब फार्मवर भाष्य केले. "जेव्हा एखाद्या खेळाडूवर दबाव असतो तेव्हा त्याला सहानुभूती दाखवावी लागते. मी येथे थेट मुख्य खेळाडूबद्दल बोलत आहे. विराट कोहली ओव्हरबोर्ड झाला आहे. जर कोणाला विश्रांतीची गरज असेल, तर तो कोहली आहे. मग ते असो. 2 महिने किंवा दीड महिना, मग तो इंग्लंड नंतर असो किंवा इंग्लंडच्या आधी. त्याला विश्रांतीची गरज आहे. कारण त्याच्याकडे 6-7 वर्षांचे क्रिकेट बाकी आहे.
त्याने जर ब्रेक घेतला नाही तर तो खचलेल्या मनाच दिसेल. आणि इतका चांगाल खेळाडू आपण गमावू इच्छित नाही. तो एकटा नाही. जागतिक क्रिकेटमध्ये असे एक किंवा दोन खेळाडू असू शकतात जे या टप्प्यातून जात आहेत. तुम्हाला आधीच समस्या सोडवावी लागेल. असा सल्ला त्यांनी व्यवस्थापनेला दिला आहे.
यापूर्वी 2017 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध कोहली गोल्डन डकवर बाद झाला होता. यादरम्यान त्याला नॅथन कुल्टर-नाईलने बाद केले. त्याचवेळी 2008 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. यानंतर 2014 मध्ये पंजाबविरुद्धच्या सामन्यात कोहली गोल्डन डकवर बाद झाला होता.
आरसीबीचे कर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीने आयपीएल 2022 मध्ये प्रवेश केल्यामुळे त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. कोहलीने गेल्या 6 महिन्यांत T20I कर्णधारपद सोडले, त्यानंतर त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आणि बॅटने संघासाठी योगदान देण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने स्वतः कसोटी कर्णधारपद सोडले. मात्र, कोहलीने आयपीएल 2022 मध्ये 7 सामन्यांत 19.83 च्या सरासरीने केवळ 119 धावा केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Ipl 2022, Ravi shashtri, RCB, Virat kohli