जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Bushfire Cricket Bash : ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी धावून आला सचिन! आता थेट होणार कोच

Bushfire Cricket Bash : ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी धावून आला सचिन! आता थेट होणार कोच

Bushfire Cricket Bash : ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी धावून आला सचिन! आता थेट होणार कोच

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी धावून आला असून, ऑस्ट्रेलिया संघाचा तो प्रशिक्षक होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सिडनी, 21 जानेवारी : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात कायमच क्रिकेटमध्ये वैमानस्य राहिले आहे. शेन वॉर्न आणि सचिन तेंडुलकर, जहीर खान आणि रिकी पॉटिंग ते आता कुलदीप यादव-डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ-विराट कोहली यांच्यात नेहमीच एक वेगळ्या प्रकारचा तशन दिसून येतो. मात्र पहिल्यांदाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी धावून आला असून, ऑस्ट्रेलिया संघाचा तो प्रशिक्षक होणार आहे. मात्र हा कोणताही आंतरराष्ट्रीय सामना नाही तर ही आहे चॅरिटी लीग बुशफायर क्रिकेट बॅश. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू रिकी पॉटिंग आणि शेन वॉर्न यांनी आगीत होरपळलेल्या ऑस्ट्रेलियाला मदत करण्यासाठी एक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या तिकीटातून जमा होणाऱ्या पैशातून ऑस्ट्रेलियातील आगीमध्ये नुकसान झालेल्या घरांच्या पुर्नवसनासाठी मदत केली जाणार आहे. यासाठी सचिनही पुढे आला आहे. यात सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचे कॉर्टिनी वॉल्श हे पॉंटिंग आणि वॉर्न संघाचे कोच असणार आहेत. बुशफायर क्रिकेट लीग ही स्पर्धा 8 फेब्रुवारी रोजी खेळवली जाणार आहे. वाचा- कॅप्टन कोहलीच्या एका चुकीमुळे भारत गमावणार टी-20 वर्ल्ड कप?

जाहिरात

वाचा- बाप असावा तर असा! संघाला सामना जिंकून दिल्यानंतर लेकीसोबत खेळताना दिसला रोहित गतवर्षी अॅमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीनंतर आता ऑस्ट्रेलियातील जंगलात भीषण आग लागली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आग आहे. गेल्या 4 महिन्यांपासून ही आग धगधगत आहे. या आगीनं आतापर्यंत 50 कोटीहून अधिक प्राण्यांचा जीव घेतला आहे. अखेर अचानक पडलेल्या पावसामुळं ही आग नियंत्रणात आणण्यात सरकारला यश आले. मात्र ऑस्ट्रेलियातील जीवन पुर्वपदावर येण्यासाठी जगभरातून मदतीचा हाक दिली जात आहे. दरम्यान, या मदतकार्यासाठी आता क्रिकेटपटू पुढे आले आहे. याआधी शेन वॉर्ननं आपल्या आवडत्या टोपीचा लिलाव केला होता. वाचा- रक्तबंबाळ होऊन कुंबळे खेळला क्रिकेट! पाहा तो क्षण ज्याचा मोदींनी केला उल्लेख

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात