Home /News /sport /

VIDEO : बाप असावा तर असा! संघाला सामना जिंकून दिल्यानंतर लेकीसोबत खेळताना दिसला रोहित

VIDEO : बाप असावा तर असा! संघाला सामना जिंकून दिल्यानंतर लेकीसोबत खेळताना दिसला रोहित

ऑस्ट्रेलियाशी पंगा घेतल्यानंतर लेकीसोबत खेळता दिसला हिटमॅन, पाहा हा क्युट VIDEO

  बंगळुरू, 20 जानेवारी : रोहित शर्माचे शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला 7 गडी राखून पराभूत केले. तिसरा एकदिवसीय सामना पाहण्यासाठी रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) आणि मुलगी समायराही (Samaira Sharma) सामन्यादरम्यान उपस्थित होती. ऑस्ट्रेलियाचा डाव संपल्यानंतर रोहित शर्मा आपली लेक समायराला भेटला यावेळी रोहित समायरासोबत खेळताना दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पहिली इनिंग संपल्यानंतर रोहित शर्माने समायराला उचलून घेतले आणि बॉटलमधून पाणी पित होत. तेवढ्या समायराने रोहितच्या हातातून बॉटल घेण्याचा प्रयत्न केला. रोहित शर्माने पाहिले आणि बॉटल काढून घेतली. समायरा आणि रोहित यांच्यातील हा खेळ कॅमेरात कैदा झाला. या व्हिडिओला आतापर्यंत 3 लाखाहून अधिक पसंती मिळाल्या आहेत. वाचा-70 मोबाईल, 7 लॅपटॉप आणि 11 जण! भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर लावला 2 कोटींचा सट्टा
  @shivtripathi007#4u #rohitsharma #cutie #babygirl #doll #tredding #UpForXtra #viral #viralvideo #foryou #foryoupage ♬ Original Sound - Unknown
  वाचा-रोहित शर्माने सुसाट केल्या 9000 धावा, विराट कोहलीला 'हाय अलर्ट'! भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या निर्णायक सामन्यात रोहित शर्मानं आपले 29वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. रोहित शर्माचे हे 29वे एकदिवसीय शतक असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेले हे 8वे शतक आहे. याचबरोबर रोहितनं 29वे शतक करण्याची कामगिरी फक्त 217 सामन्यांत केली आहे. यासह त्यानं सचिन तेंडुलकर (265) आणि रिकी पॉटिंग (330) यांना मागे टाकले आहे. याआधी विराटनं 29 शतक करण्यासाठी 185 सामने घेतले होते. रोहित शर्मानं वर्ल्ड कपपासून आपला फॉर्म सोडलेला नाही आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपनंतर प्रत्येक मालिकेत रोहितनं चांगली कामगिरी केली आहे. वाचा-शतक एक विक्रम अनेक! कांगारूंची शिकार करत 'हिटमॅन'ने सचिनलाही टाकले मागे सर्वात जलद पार केला 9 हजारांचा टप्पा एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने 9 हजार धावा पूर्ण केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9 हजार धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा जगातील तिसरा वेगवान खेळाडू आहे. हा आकडा गाठण्यासाठी रोहितने 217 सामने खेळले. याआधी विराटनं 194 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. त्यामुळं सर्वात वेगवान 9 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्यापाठोपाठ एबी डिव्हिलियर्सने 208 डावांमध्ये ही कामगिरी केली. विशेष म्हणजे रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीची सुरूवात अत्यंत संथ शैलीने केली होती. रोहितने 82 डावांमध्ये 2000 वनडे धावा पूर्ण केल्या. 2000 धावा पूर्ण करणारा तो तिसरा सर्वात कमी गतीनं धावा करणारा भारतीय खेळाडू होता. यानंतर रोहित शर्माने धावांची भागीदारी केली आणि पुढच्या 7 हजार धावा खूप वेगात केल्या.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Cricket

  पुढील बातम्या