टीम इंडिया अजूनही अपूर्ण! कॅप्टन कोहलीच्या एका चुकीमुळे भारत गमावणार टी-20 वर्ल्ड कप?

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मालिका जिंकत असला तरी, भारताचे लक्ष टी-20 वर्ल्ड कपकडे आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जानेवारी : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मालिका जिंकत असला तरी, भारताचे लक्ष टी-20 वर्ल्ड कपकडे आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ तयारी करत आहे. मात्र सध्या भारतीय संघाकडे अष्टपैलू खेळाडूची जागा अजूनही रिक्त आहे. भारताला अशा एका खेळाडूची गरज आहे, जो सीम गोलंदाजीबरोबर फलंदाजीही करेल. भारताकडे हार्दिक पांड्याच्या रुपात एक चांगला पर्याय असला तरी पांड्याच्या फिटनेसबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही. त्यामुळं पांड्याच्या बदली भारताकडे चांगला पर्याय नाही.

याआधी वर्ल्ड कप 2019मध्ये विजय शंकरला संघात जागा मिळाली होती. त्यानंतर शिवम दुबेनेही संघासाठी काही महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र .या दोन्ही खेळाडूंवर विराट कोहलीनं विश्वास दाखवला नाही. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं एक उपयोगी अष्टपैलू खेळाडूची भारताला सर्वात जास्त गरज आहे. त्यामुळं हार्दिक पांड्याला बदली खेळाडू देण्यात भारताला अपयश आले तर त्याचा फटका भारताला वर्ल्ड कपमध्ये बसू शकतो. ऑस्ट्रेलियामध्ये खेळपट्टी उसळी असल्यामुळं सीम गोलंदाजांची भारताला सर्वात जास्त गरज आहे.

वाचा-धोनी आणि पंतला कॅप्टन कोहली देणार नारळ? संघाला मिळाला नवा विकेटकीपर!

सध्या भारतीय संघाचे लक्ष न्यूझीलंड दौऱ्याकडे आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळं निवड समितीनं लवकरात लवकर संघाची निवड करण्यासाठी भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या याला डेडलाईन दिली आहे. त्यामुळं पांड्याला संघात जागा निश्चित करण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणे बंधनकारक असणार आहे. हार्दिक पांड्या एक उपयुक्त फलंदाज आणि गोलंदाज आहे. यामुळे त्याने भारतीय संघासाठी तिन्ही स्वरूपात खेळणे गरजेचे आहे. हार्दिक पांड्या खालच्या फळीत मोठे शॉट खेळण्यासाठी ओळखला जातो. मात्र त्याच्या फिटनेकडे लक्ष देण्याचे गरज आहे.

वाचा-मुंबई इंडियन्सनं संघातून काढलं, आता याच क्रिकेटपटूचा अफलातून कॅच होतोय VIRAL

विजय शंकरला पुन्हा मिळणार जागा?

हार्दिक पांड्याशिवाय टीम इंडियाकडेही विजय शंकरचा पर्याय आहे. दोघेही वर्ल्ड कप 2019 मध्ये एकत्र खेळले. विजय शंकरवर टीम इंडियामधील 4 व्या क्रमांकाच्या फलंदाजाची तयारी करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचे फलंदाजीचे तंत्र खूप चांगले आहे, जे वरील जागेवर खेळण्यासाठी योग्य आहे. तसेच त्याची गोलंदाजीही ठीक आहे आणि सुरुवातीला त्याला विकेटही मिळतात. पण त्याचा वेग पांड्यापेक्षा कमी आहे. शंकरसुद्धा दुखापतींमुळे टीम इंडिया बाहेर आहे. मात्र, त्याने आता पुन्हा घरगुती क्रिकेटमध्ये कमबॅक केला आहे. त्यामुळं त्याला टीम इंडियात पुन्हा जागा मिळू शकते.

वाचा-टीम इंडियाच्या मॅचविनर खेळाडूने हातात बंदूक घेऊन केला होता आत्महत्येचा प्रयत्न

शिवम दुबेला का नाही मिळाली संधी?

बांगलादेशविरुद्ध शिवम दुबेनं चांगली फलंदाजी केली होती. मात्र त्यानंतर त्याला पुन्हा संघात जागा मिळाली नाही. दुबे चांगला फलंदाज अजून मिलिट्री मीडियम पेस गोलंदाजीही करू शकतो. वेस्‍टइंडीज विरुद्ध त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली होती. एका सामन्यात तर त्यानं एका ओव्हरमध्ये दोन विकेट घेत भारताला विजयही मिळवून दिला होता. मात्र त्यानंतर विराटनं शिवम दुबेला संघात जागा दिली नाही. त्यामुळं विराटला एका सीम गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूला तयार करण्याची गरज आहे. अन्यथा ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकणे सोपे होणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jan 21, 2020 08:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading