#ParikshaPeCharcha2020 : VIDEO : रक्तबंबाळ अवस्थेत अनिल कुंबळे खेळला होता क्रिकेट! पाहा तो क्षण ज्याचा मोदींनी आपल्या भाषणात केला उल्लेख

#ParikshaPeCharcha2020 : VIDEO : रक्तबंबाळ अवस्थेत अनिल कुंबळे खेळला होता क्रिकेट! पाहा तो क्षण ज्याचा मोदींनी आपल्या भाषणात केला उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थी, शिक्षण व पालकांशी सकाळी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाअंतर्गत संवाद साधत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थी, शिक्षण व पालकांशी सकाळी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाअंतर्गत संवाद साधत आहेत. या कार्यक्रमात विशेष करून दिव्यांग विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींना भेटण्याची आणि त्यांना प्रश्न विचाण्याची संधी मिळाली आहे. नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांना कानमंत्र देत आहे. दरम्यान यावेळी मोदींनी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 2001मध्ये झालेल्या कसोटी सामन्याचे उदाहरण देत राहुल द्रविड आणि लक्ष्मण यांच्या झुंजी खेळीची उदाहरण दिले. मोदींनी यावेळी, “राहुल द्रविड आणि लक्ष्मणने निकराची झुंज दिली आणि तो सामना जिंकला त्यामुळे लक्षास असूद्या की आपण अपयशातूनही यशाचा मार्ग शिकतो. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयशातही यशाची गुरुकिल्ली मिळते”, असे सांगितले.

वाचा-pariksha pe charcha 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

वाचा-परीक्षा ही केवळ जीवनातील महत्त्वपूर्ण पायरी, संपूर्ण जीवन नव्हे – नरेंद्र मोदी

तसेच, 2002मध्ये भारत-वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेच्या जबड्याला बाउन्सर लागला होता. यात कुबंळेचा जबडाही फाटला होता. त्यानंतरही रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत कुंबळे गोलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि त्यानं गोलंदाजी केली. एवढेच नाही तर गोलंदाजी करत आपल्या फिरकीच्या जोरावर त्यानं सर्वात खतरनाक फलंदाज ब्रायन लारा याला बाद केले.

वाचा-'...म्हणून शबाना आझमी अपघातातून थोडक्यात वाचल्या', मित्रानं केला मोठा खुलासा

वाचा-क्रिकेट खेळताना भांडण टोकाला, पोटात बुक्की मारल्याने 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

मोदींनी विद्यार्थ्यांना तणावमुक्तीचे धडे देत अनिल कुंबळेचे उदाहरण देत संवाद साधला. सलग तिसऱ्यांदा मोदी जगभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.

First published: January 20, 2020, 12:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading