जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / KKR vs RR मॅचदरम्यान तू-तू मैं-मैं , फिंच आणि कृष्णामध्ये शाब्दिक चकमक, VIDEO

KKR vs RR मॅचदरम्यान तू-तू मैं-मैं , फिंच आणि कृष्णामध्ये शाब्दिक चकमक, VIDEO

kkr vs rr

kkr vs rr

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर कोलकाता नाईट रायडर्स (KKR)आणि राजस्थान रॉयल्सदरम्यान (RR) मॅच खेळवण्यात आली. मात्र, या सामन्यातील अनेक किस्से सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. मॅचदरम्यान स्लेजिंगचा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 एप्रिल: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर कोलकाता नाईट रायडर्स (KKR)आणि राजस्थान रॉयल्सदरम्यान (RR) मॅच खेळवण्यात आली. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही टीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. सोमवारी राजस्थाननं कोलकातावर रोमांचक विजय मिळवला. मात्र, या सामन्यातील अनेक किस्से सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. मॅचदरम्यान स्लेजिंगचा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) फलंदाज आरोन फिंच आणि राजस्थान रॉयल्सचा (RR) वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. राजस्थान रॉयल्सच्या 218 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाची सुरुवात दमदार झाली. आरोन फिंच आणि श्रेयस अय्यरच्या झंझावाती फलंदाजीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) 8.3 षटकांत 107 धावा कुटल्या. नवव्या षटकात अॅरॉन फिंचला वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने बाद करून राजस्थान रॉयल्सला पुन्हा पटरीवर आणले. किंग खानच्या मुलीला पाहून SRH च्या फॅन्सचा बदलला विचार, पोस्टर झळकावत दिली प्रेमाची कबुली नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर ऍरॉन फिंचने करुण नायरकरवी झेलबाद केले. अॅरॉन फिंच आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनकडे जात असताना प्रसिद्ध कृष्णा त्याला स्लेजिंग करताना दिसला. प्रसिद्ध कृष्णाच्या स्लेडिंगला अॅरॉन फिंचनेही चोख प्रत्युत्तर दिले. या दोघांमधील तू-तू मैं-मैंचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जाहिरात

या सामन्यात अॅरॉन फिंच 28 चेंडूत 58 धावा करून बाद झाला. अॅरॉन फिंचच्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. अॅरॉन फिंच थोडा वेळ क्रीझवर राहिला असता तर सामन्यातील चित्र पालटले असते. राजस्थानने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 217 धावा केल्या होत्या. यानंतर चहलच्या फिरकीच्या जादूसमोर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 19.4 षटकांत 210 धावांवर गारद झाला. हा सामना राजस्थानने 7 धावांनी खिशात घातला. हा राजस्थानचा हंगामातील चौथा विजय होता. या विजयाचा शिल्पकार जोस बटलर ठरला. बटलर, युझवेंद्र चहल आणि ओबेद मॅककॉय हे राजस्थान संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. चहलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात