मुंबई, 19 एप्रिल: आयपीएलचा(IPL) महाकुंभ सुरु झाला की, आपल्या आवडत्या टीमला आणि आपल्या आवडत्या खेळाडूला चिअर करण्यासाठी अनेक चाहते मैदानावर उपस्थिती लावतात. कॅमेराचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी चाहते अनेक करामतीही करत असतात. सध्या असाच एका तरुणाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याने त्यामध्ये तो बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानची मुलगी सुहाना हिच्या प्रेमात असल्याची कबुली दिली आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्सदरम्यान (RR) मॅच खेळवण्यात आली. हा सामना पाहण्यासाठी एक तरुण ब्रेबॉर्नच्या मैदानावर पोहचला होता. मात्र, तो सनरायझर्स हैदराबादचा फॅन होता असे त्याने म्हटले आहे. तसेच त्याने पोस्टामध्ये शाहरुखची मुलगी सुहानीसाठी तो आता केकेआरचा फॅन झाला असल्याची कबुलीदेखील दिली आहे. आयपीएलच्या स्टेडिअममध्ये क्रिकेट चाहत्यांचा वेगवेगळा अंदाज पाहिला मिळतो. एका चाहत्याने ‘मी इथं हैदराबादच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलो आहे, पण केकेआरचा मालक आणि बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या मुलीला पाहून माझा विचार बदलला’ आशा आशयाचे पोस्टर झळकावले आहे. सध्या हे पोस्टर चर्चेत आले आहे. या तरुणाने सुहाना हिच्या प्रेमात असल्याची कबुली दिली आहे. अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
केकेआर मॅच दरम्यान सुहाना आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी अनेकवेळा मैदानात उपस्थिती लावते. काहीदिवसांपूर्वी, सुहाना खान चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे या दोघींनी मैदानात हजेरी लावली होती. नुकतंच, सुहानाच्या डेब्यू चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. सुहाना सोबत अभिनेत्री जान्हवी कपूरची बहिण खुशू कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही या चित्रपटात दिसणार आहे.