Home /News /sport /

कोण पंत? ऋषभने रोहितला दिलेल्या सिक्सर चॅलेंजवर भडकला हिटमॅन, LIVE VIDEOमध्ये केला अपमान

कोण पंत? ऋषभने रोहितला दिलेल्या सिक्सर चॅलेंजवर भडकला हिटमॅन, LIVE VIDEOमध्ये केला अपमान

ऋषभ पंतने रोहितला सर्वात लांब षटकार मारण्याचे चॅलेंज दिले होते, यावर रोहितने पंतची शाळा घेतली.

    मुंबई, 02 एप्रिल : कोरोनाचा फटका सर्व क्षेत्रांना बसला आहे. कोरोनामुळे क्रिकेटचे सर्व सामने रद्द झाले आहेत. त्यामुळं सर्व खेळाडू सध्या घरी विश्रांती घेत आहेत. यातच भारताचा उप-कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनी आपल्या चाहत्यांसाठी इंस्टाग्राम लाइव्ह केले. या इंस्टाग्राम लाइव्ह दरम्यान या दोघांनी अनेक क्रिकेटपटूंची शाळा घेतली. या व्हायरस व्हिडीओमध्ये बुमराह रोहितला सांगतो की, पंतने रोहितला सर्वात लांब षटकार मारण्याचे चॅलेंज दिले आहे. हे ऐकून रोहित शर्मा आश्चर्यचकित होऊन विचारतो, "पंत कोण असं बोलतोय?. एक वर्ष झालं नाही त्याला क्रिकेट खेळून चॅलेंज कसले देतो", असे म्हणज पंतची शाळा घेतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले हिटमॅनचे आभार, म्हणाले Thank You रोहित वाचा-9 वर्षांपूर्वी धोनीने ऐतिहासिक षटकार लगावला तेव्हा तुम्ही काय करत होता? रोहितने घेतली चहलची फिरकी लाईव्हमध्ये चहलवर बोलताना रोहित म्हणाला की, "चहल टीकटॉक स्टार झाला आहे. तो रन सिनेमातल्या विजय राज सारखा अभिनय करो". दरम्यान बुमराह आणि रोहितच्या लाईव्ह चॅटमध्ये चहलने बुमहारच्या हेअरस्टाइलचेही कौतुक केले. वाचा-या 5 दिग्गज खेळाडूंच्या करिअरवर Coronavirus चे संकट, घ्यावी लागणार निवृत्ती! रोहित झाला फिट लाईव्ह दरम्यान , रोहित शर्मा म्हणाला की आता तो पूर्णपणे फिट आहे. तो म्हणाला, "मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे, खेळायला तयार आहे, पण हा कोरोनाव्हायरसमध्ये आला". रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर कसोटीमध्येही तो खेळू शकला नव्हता. दरम्यान रोहितला आयपीएलमधून कमबॅक करायचे होते, मात्र कोरोनामुळं आयपीएल रद्द होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाबाधितांसाठी रोहितने केली 80 लाखांची मदत मुंबई रोहित शर्मानेही कोरोनाग्रस्तांनी मदत केली आहे. भारतीय संघाचा एकदिवसीय आणि टी-20 उप-कर्णधार रोहित शर्माने या लढाईविरुद्ध आपले योगदान दिले आहे. रोहित शर्माने, 'आपल्या देशाला पुन्हा पायावर उभे करण्याची गरज आहे. यासाठी मी पीएम केअर फंडला 45 लाख, मुख्यमंत्री मदत निधी (महाराष्ट्र) 25 लाख, फीडिंग इंडियाला 5 लाख आणि स्ट्रे डॉग्सच्या कल्याणसाठी 5 लाख देण्याचे ठरविले आहे', अशी माहिती ट्वीट करत दिली. अशा प्रकारे रोहित शर्मा यांनी एकूण 80 लाख रुपयांची मदत केली आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket, Rohit sharma

    पुढील बातम्या