धोनी आणि गंभीरची विजयी खेळी 2011च्या वर्ल्ड कपमध्ये धोनीने शेवटच्या सामन्यात एक अविस्मरणीय षटकार खेचला होता, सचिन तेंडुलकर, झहीर खान, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग या दिग्गजांसह भारतीय संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळत होता. 2007 साली धोनीने संघाला प्रथम टी -20 चॅम्पियन बनवले होते. केवळ एक सामना गमावत भारत अंतिम सामन्यात पोहचला होता. उपांत्या सामन्यात भारताने कट्टर वैरी असलेल्या पाकिस्तानला हरवले होते. श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत भारताला 275 धावांचे लक्ष्य दिले. भारताची सलामीची जोडी काही आश्चर्यकारक कामगिरी करू शकली नाही. सचिन 18 तर सेहवाग पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात गौतम गंभीरने 122 चेंडूत 97 धावांची शानदार खेळी खेळल्यानंतर विराट कोहलीबरोबर महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यानंतर धोनी क्रीजवर आला आणि शेवटपर्यंत थांबला. भारताला विजयासाठी 11 चेंडूत 4 धावांची गरज होती, त्यानंतर धोनीने षटकार मारत संपूर्ण देशाला आनंद साजरा करण्याची संधी दिली.#OnThisDay in 2011
— Cricketopia (@CricketopiaCom) April 1, 2020
Dhoni finishes off in style.
Where were you at this moment?pic.twitter.com/jhatUHqSEb
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket