Home /News /sport /

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले हिटमॅनचे आभार, म्हणाले Thank You रोहित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले हिटमॅनचे आभार, म्हणाले Thank You रोहित

भारतीय संघाचा एकदिवसीय आणि टी-20 उप-कर्णधार रोहित शर्माने कोरोनाविरुद्धच्या लढईत आपले योगदान दिले आहे.

    मुंबई, 31 मार्च : कोरोनाव्हायरसची (COVID-19) दहशत दिवसेंदिवस भारतात वाढत आहे. कोरोनाविरुद्ध लढाईत सरकार आपल्या परीने उपाययोजना करत आहे. सरकारला मदत करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि उद्योगपतींना हातभार लावला आहे. यातच मुंबई रोहित शर्मानेही कोरोनाग्रस्तांनी मदत केली आहे. भारतीय संघाचा एकदिवसीय आणि टी-20 उप-कर्णधार रोहित शर्माने या लढाईविरुद्ध आपले योगदान दिले आहे. या रोगाविरुद्ध लढण्यासाठी याआधी महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांसह अनेक क्रिकेटपटू पुढे आले आहेत. रोहितनं आज ट्वीट करत, कोरोनाग्रस्तांना मदत करत असल्याचे सांगत, तुम्हीही तुमच्या परीने मदत करा असे आवाहन केले. रोहित शर्माने, 'आपल्या देशाला पुन्हा पायावर उभे करण्याची गरज आहे. यासाठी मी पीएम केअर फंडला 45 लाख, मुख्यमंत्री मदत निधी (महाराष्ट्र) 25 लाख, फीडिंग इंडियाला 5 लाख आणि स्ट्रे डॉग्सच्या कल्याणसाठी 5 लाख देण्याचे ठरविले आहे', अशी माहिती ट्वीट करत दिली. अशा प्रकारे रोहित शर्मा यांनी एकूण 80 लाख रुपयांची मदत केली आहे. वाचा-टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर, जपानला बसणार मोठा फटका! रोहित शर्माने ट्वीट केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोहितचे आभारही मानले. वाचा-Real Champion! कोरोनाशी लढण्यासाठी 15 वर्षाच्या शूटरने केली 30000 ची मदत विराटने केली होती मदत जाहीर यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ट्विट केले होते की, 'अनुष्का आणि मी पीएम-केअर फंड आणि मुख्यमंत्री मदत निधी (महाराष्ट्र) यांना मदत करण्याची शपथ घेतो.' तसेच, 'बर्‍याच लोकांना धडपडताना पाहून मला वाईट वाटत आहे. आम्हाला आशा आहे की आमच्या योगदानामुळे आमच्या सहकाऱ्यामुळे नागरिकांचे दुःख कमी होण्यास मदत होईल.', असे सांगितले होते. वाचा-धोनीला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे 'DSP' आता कोरोना वॉरियर्स, ICCनही केलं कौतुक सचिनने केली 50 लाखांची मदत विशेष म्हणजे यापूर्वी भारतीय फलंदाज सुरेश रैनाने 52 लाख रुपयांची देणगी दिली. सचिन तेंडुलकर यांनी 50 लाख, पीव्ही सिंधूने 10 लाख दिले होते. अजिंक्य रहाणेने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मदत निधीला 10 लाख, सौरव गांगुली यांनी गरजूंना तांदळासाठी 50 लाख, ईशान किशनने 20 लाख, माजी क्रिकेटपटू अतुल वासन यांनी 5 लाख आणि सौरभ तिवारी यांनी दीड लाख रुपयांची देणगी दिली आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Cricket

    पुढील बातम्या