मुंबई, 3 मे: लागोपाठ 5 पराभवांनंतर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर आली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (KKR vs RR) सामन्यात केकेआरचा 7 विकेटने विजय झाला आहे. राजस्थानने दिलेलं 153 रनचं आव्हान केकेआरने 19.1 ओव्हरमध्ये पार केलं. रिंकू सिंग (Rinku Singh) आणि नितीश राणा (Nitish Rana) केकेआरच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या विजयानंतर रिंकू सिंगने माध्यमांशी संवाद साधला. गेली 5 वर्षापासून तो ही संधी शोधत असल्याचे त्याने म्हटले आहे. विजयासाठी दिलेले 153 धावांचे लक्ष्य केकेआरने 19.1 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. या विजयानंतर सामनावीर रिंकूने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘अलिगडचे अनेक खेळाडू रणजी ट्रॉफी खेळले आहेत, पण आयपीएल खेळणारा मी पहिला खेळाडू आहे. हे (IPL) इतर देशांतर्गत स्पर्धांपेक्षा खूप वेगळे आहे. मोठी स्पर्धा असते तेव्हा खूप दडपण असल्याचे त्याने यावेळी म्हटले आहे. IPL 2022 : KKR पुन्हा विजयाच्या मार्गावर, रिंकू ठरला शाहरुखच्या टीमचा बाजीगर! तसेच, “मी पाच वर्षांपासून अशा संधीची वाट पाहत होतो, पण मला नियमित संधी मिळत नव्हती. देशांतर्गत स्पर्धांमध्ये खूप धावा केल्या, माझ्यात चांगली कामगिरी करण्याचा आत्मविश्वास होता. ’’ अशी भावना त्याने यावेळी व्यक्त केली. नितीश राणासोबतच्या उत्कृष्ट भागीदारीबद्दल विचारले असता तो म्हणाला, “आम्ही फक्त सामना शेवटपर्यंत नेण्यासाठी बोलत असल्याचे त्याने म्हटले आहे. राजस्थानविरुद्ध झालेल्या या सामन्यात नितीश राणाने 37 बॉलमध्ये नाबाद 48 आणि रिंकू सिंगने 23 बॉलमध्ये नाबाद 42 रनची खेळी केली. केकेआरला लागोपाठ 5 पराभवांनंतरचा हा पहिला विजय आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना हा विजय मिळवणं गरजेचं होतं. या मोसमात केकेआरने 10 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर 6 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. राजस्थानविरुद्धच्या या विजयासह केकेआर पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







