जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / SRH vs KKR : कोलकाता नाइट राइडर्समध्ये मोठा बदल, अजिंक्य रहाणे OUT

SRH vs KKR : कोलकाता नाइट राइडर्समध्ये मोठा बदल, अजिंक्य रहाणे OUT

SRH vs KKR : कोलकाता नाइट राइडर्समध्ये मोठा बदल, अजिंक्य रहाणे OUT

आज इंडियन प्रीमियर लीगच्या 15(IPL 2022) व्या हंगामातील 25 वा सामना खेळला जात आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादचा(SRH vs KKR ) कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 एप्रिल: आज इंडियन प्रीमियर लीगच्या 15(IPL 2022) व्या हंगामातील 25 वा सामना खेळला जात आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादचा(SRH vs KKR ) कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मैदानात उतरण्यापूर्वी दोन्ही संघामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने तीन बदल केले आहेत. सॅम बिलिंग्ज, अजिंक्य रहाणे आणि रसिक सलाम यांच्या जागी शेल्डन जॅक्सन, अॅरॉन फिंच आणि अमन खान यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. आरोन फिंच आणि अमन खान कोलकाता नाईट रायडर्सकडून पदार्पण करत आहेत. दोघांना डेव्हिड हसीने संघाची कॅप दिली. सनरायझर्स हैदराबादला आज वॉशिंग्टन सुंदरची साथ मिळणार नाही.  सनरायझर्स संघाला मजबुरीत बदल करावा लागला आहे. दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी जगदीश सुचितचा संघात समावेश करण्यात आला आहे.  गुजरातविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करणारा अष्टपैलू सुंदर जखमी झाला. यानंतर संघाचे प्रशिक्षक टॉम मूडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या हाताला दुखापत झाली असून तो किमान दोन सामने खेळू शकणार नाही. हे ही वाचा- LED स्टंपची किंमत माहिती आहे का? वाचा हार्दिकनं किती केलं BCCI चं नुकसान हैदराबाद भिषेक शर्मा, केन विल्यमसन, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन, एडन मार्कराम, शशांक सिंग, जगदीश सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को येनसेन, उमरान मलिक, टी नटराजन कोलकाता आरोन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन, पॅट कमिन्स, सुनील नरेन, उमेश यादव, अमन हकीम खान, वरुण चक्रवर्ती

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात