मुंबई, 15 एप्रिल : गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) आयपीएल 2022 मधील (IPL 2022) 24 व्या मॅचमध्ये संजू सॅमसनला रन आऊट करण्यासाठी थेट थ्रो केला. हार्दिकच्या थ्रोमुळे संजू रन आऊट झाला, त्यावेळी स्टंपचे दोन तुकडे झाले. हार्दिकला ऑल राऊंड खेळामुळे 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला. पण, त्यानं बीसीसीआयचं चांगलंच नुकसान केलं.
हार्दिकनं सॅमसनला रन आऊट केल्यानंतर गुजरात टायटन्सचे खेळाडू जोरदार सेलिब्रेशन करत होते. त्यावेळी आयोजकांची काळजी मात्र वाढली. हार्दिकच्या एका थ्रो मुळे बीसीसीआयचं 2 लाख, 5 लाख किंवा 10 लाख नाही तर त्यापेक्षा जास्त नुकसान केलं आहे.
नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या या LED स्टंम्प्सच्या एका सेटची किंमत 35 ते 40 लाख रूपये असते. त्यावरून हार्दिकच्या थ्रो मुळे आयोजकांची काळजी का वाढली हे तुम्हाला समजू शकेल. आयपीएलच्या या सिझनमधील आणखी 50 सामने बाकी आहेत. ही स्पर्धा अद्याप अर्धीही पूर्ण झालेली नाही. त्यापूर्वीच आयोजकांचं इतकं मोठं नुकसान झालं आहे.
मॅच फिसच्या बरोबरीनं किंमत
LED स्टंप्सच्या एका सेटची किंमत मॅच फिसच्या बरोबर असते. वन-डे मॅच खेळणाऱ्या प्लेईंग 11 मधील भारतीय खेळाडूला साधारण 60 लाख तर टी20 खेळणाऱ्या खेळाडूला 30 लाख मिळतात. तर स्टंप्सच्या एका सेटची किंमत जवळपास 40 लाख रूपये असते. टी20 वर्ल्ड कपमध्येही याच प्रकारचे स्टंप्स वापरण्यात आले होते.
ऑस्ट्रेलियातील ब्रॉन्टे एकरमॅननं LED स्टंप्सची निर्मिती केली. त्यानं त्याचा बिझनेस पार्टनर डेव्हिज लेगिटवूडसोबत जिंग इंटरनॅशनल या कंपनीचा स्थापना केली. ऑस्ट्रेलियात 2013 साली झालेल्या बिग बॅश लीग स्पर्धेत याचा पहिल्यांदा वापर केला. आसीसीनं 2014 साली बांगलादेशमध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा हे स्टंप्स वापरले. या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला.
IPL 2022 : 3 खेळाडूंच्या जोरावर KKR ला चॅलेंज देणार हैदराबाद, पाहा संभाव्य Playing 11
अंपायर्सना मदत
LED स्टंप्स अंपायर्ससाठी अतिशय उपयुक्त आहेत. यामधील तंत्रज्ञानामुळे याची किंमत इतकी जास्त आहे. बेल्समध्ये लावण्यात आलेल्या मायक्रोप्रोसेसरमुळे सर्व मुव्हमेंट्स समजतात. त्याचबरोबर स्टंप्समधील बॅटरीची क्षमताही जास्त असते. त्यामुळे बॉल बेल्सवर लागताच रेड लाईट लागते. याच्या सेन्सरमुळे सेकंदामधील 1000 व्या भागात झालेली हलचाल देखील समजते. एका बेलची किंमत 50 हजार रूपये आहे. ट्रान्सपरन्ट प्लॅस्टिकनं बनलेल्या या बेल्सला बॉलचा निसटता स्पर्श जरी झाला तरी त्याची लगेच माहिती होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.