दिल्ली, 1 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट संघाचे (
Indian Cricket Team) मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा UAE मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकानंतर (
T20 WorldCup) प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे आगामी काळात मुख्य प्रशिक्षक म्हणून कुणाची वर्णी लागणार याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारतीय संघाने अनेक विक्रम, किर्तीमाने रचली आहेत. आता रवी शास्त्री
(Ravi Shashri) यांनी स्वतःच मला आणखी कार्यकाळ वाढवून मिळू नये, अशी मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (
BCCI) केली आहे. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट संघाचा (
Team India coach) नवीन प्रशिक्षक कोण असणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
शास्त्री यांनी टाईम्स नाऊ (Times Now) या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत यासंदर्भातला खुलासा केला आहे. त्यांचा कार्यकाळ हा नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे ते मुलाखतीत बोलताना म्हणाले की आता मला फक्त माझ्या उरलेल्या 45 दिवसांची चिंता आहे. येणाऱ्या काळात मला काय करायचं आहे ते लवकरच कळवेन. असं त्यांनी नमूद केले आहे.
शास्त्री दुसऱ्यांदा प्रशिक्षक झाले होते!
रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाचा पहिला कार्यकाळ हा 2019 मध्ये संपला होता. परंतु ऑगस्ट 2019 मध्ये त्यांना माजी कर्णधार कपिलदेव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्त केले होते. त्यामुळे आता ही त्यांची दुसरी टर्म संपत आहे.
अजिंक्य रहाणेची होणार हकालपट्टी? सर्वात यशस्वी कॅप्टनला मिळणार नवी जबाबदारी
रवी शास्त्री आणि सौरव गांगुली यांचे संबंध कसे होते?
मुलाखतीत रवी शास्त्री यांनी माजी कर्णधार तथा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासोबत आपल्या संबंधावरही भाष्य केले आहे. कारण त्याचे संबंध तेव्हा ताणले गेले होते जेव्हा एका दौऱ्यात असताना सौरव गांगुली उशिरा पोहचल्याने शास्त्री यांनी सौरव गांगुलीला बसमध्ये घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांचे संबंध ताणले गेले होते. परंतु जेव्हा त्यांना मुलाखतीत यासंदर्भातला प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी त्यांच्या संबंधात असलेल्या तणावाला नकार दिला. जेव्हा गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष झाले आणि रवी शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले तेव्हा त्यांनी सर्व वाद संपवून समन्वय साधला होता. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांसोबत पिचवर अधिक वेळ घालवला असल्याने त्यामुळे त्यांचं आता चांगलं बॉंडिंग तयार झालं आहे.
दोघांच्या संबंधावर तयार झालेल्या या बातम्यांचं खापर रवी शास्त्री यांनी माध्यमांवर फोडलं आहे. मिडिया हा आमच्या संबंधात फुट पाडून मसाला चित्रित करतो, असा थेट आरोप त्यांनी मिडियावर केला आहे. जेव्हा 2007 च्या घटनेविषयी त्यांना मुलाखतीत विचारले तेव्हा त्यांनी या सर्व बातम्यांवर पगदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.