Home /News /sport /

IND vs ENG: अजिंक्य रहाणेची होणार हकालपट्टी? सर्वात यशस्वी कॅप्टनला मिळणार नवी जबाबदारी

IND vs ENG: अजिंक्य रहाणेची होणार हकालपट्टी? सर्वात यशस्वी कॅप्टनला मिळणार नवी जबाबदारी

हेडिंग्लेमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये (India vs England 3rd Test) टीम इंडियाचा एका इनिंगनं मोठा पराभव झाला. या पराभवानंतर ओव्हलमध्ये सुरू होणाऱ्या चौथ्या टेस्टपूर्वी भारतीय टीममध्ये मोठा बदल होण्याची चर्चा आहे.

    मुंबई, 1 स्पटेंबर : हेडिंग्लेमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये (India vs England 3rd Test) टीम इंडियाचा एका इनिंगनं मोठा पराभव झाला. या पराभवानंतर ओव्हलमध्ये सुरू होणाऱ्या चौथ्या टेस्टपूर्वी भारतीय टीममध्ये मोठा बदल होण्याची चर्चा आहे. कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) देखील याबाबतचे संकेत दिले आहेत. टीम इंडियाची मिडल ऑर्डर सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या तिघांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आलं आहे. या परिस्थितीमध्ये अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) टीममधून वगळण्यात येऊ शकते. रहाणे टीमचा व्हाईस कॅप्टन देखील आहे. त्याची जबाबदारी रोहित शर्माला (Rohit Sharma) दिली जाऊ शकते. अजिंक्यनं या सीरिजमध्ये 5  वेळा बॅटींग केली आहे. यापैकी 4 वेळा तो 20 पेक्षा जास्त रन करू शकलेला नाही. त्यानं नॉटिंघम टेस्टमध्ये 5 रन काढले होते. लॉर्ड्समध्ये 1 आणि 61 तर हेडिंग्ले टेस्टमध्ये 18 आणि 10 रन काढले आहेत. या खराब फॉर्ममुळे त्याला टीममधून हटवण्यात येऊ शकते. रोहित शर्मा हा टीम इंडियातील सिनिअर खेळाडू आहे. तसंच त्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. अजिंक्य रहाणे गेल्या वर्षभरापासून खराब फॉर्ममध्ये आहे. चेतेश्वर पुजारा आणि कॅप्टन विराट कोहली यांचीही कामगिरी या काळात चांगली झालेली नाही. पण पुजारानं तिसऱ्या टेस्टमधील दुसऱ्या इनिंगमध्ये 91 रनची खेळी करत टीममधील जागा निश्चित केली आहे. रहाणेनं 77 टेस्टमधील 130 इनिंगमध्ये 4742 रन काढले आहेत. यामध्ये 12 शतक आणि 24 अर्धशतक यांचा समावेश आहे. रहाणेच्या जागी सूर्यकुमार यादवची टीममध्ये निवड होऊ शकते. KBC 13 : ग्रेग चॅपलच्या मुद्यावर सेहवागनं घेतली गांगुलीची फिरकी, अमिताभच्या प्रश्नावर वीरुचे सिक्स! पाहा VIDEO चौथी टेस्ट 2 सप्टेंबरपासून ओव्हलवर होणार आहे. या मैदानावर स्पिन बॉलर्सचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे रविंद्र जडेजा फिट असेल तर या मॅचमध्ये टीम इंडिया जडेजा आणि अश्विनसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्या परिस्थितीमध्ये इशांत शर्माला टीममधून वगळले जाऊ शकते. 400 पेक्षा जास्त टेस्ट खेळलेल्या अश्विनला या सीरिजमध्ये आजवर एकदाही संधी मिळालेली नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Cricket news, India vs england, Rohit sharma

    पुढील बातम्या