क्रिकेट सोडून धोनी करतोय शेती! पपई, टरबूजाची लागवड करतानाचा VIDEO VIRAL

क्रिकेट सोडून धोनी करतोय शेती! पपई, टरबूजाची लागवड करतानाचा VIDEO VIRAL

क्रिकेटपासून आठ महिने दूर असलेला धोनी आता कमबॅक करण्याच्या मार्गावर आहे. असे असताना धोनी चक्क शेती करताना दिसत आहे.

  • Share this:

रांची, 27 फेब्रुवारी : क्रिकेटपासून आठ महिने दूर असलेला धोनी आता कमबॅक करण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार की काय, असे प्रश्न चाहत्यांना पडले असताना, चक्क धोनीचा शेती करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. धोनीनं फेसबुक अकाउंटवर शेती करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात धोनी सेंद्रिय शेती करताना दिसत आहे. व्हिडिओ सोबतच्या कॅप्शनमध्ये धोनीने लिहिले आहे की. रांचीमध्ये 20 दिवसांपासून टरबूज आणि पपईची सेंद्रिय शेती सुरू झाली आहे. प्रथमच इतका उत्सुक. व्हिडिओमध्ये धोनी शेती सुरू करण्यापूर्वी पूजा-अर्चना करताना दिसत आहे. यानंतर, धोनी तज्ञ शेतकऱ्यांसह पेरणी करण्यास सुरुवात केली.

वाचा-कमबॅकआधी 38 वर्षीय धोनीनं केला भयंकर स्टंट, खतरनाक VIDEO होतोय VIRAL

वाचा-फॉरेनचा जावई! ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेपटूनं केला भारतीय तरुणीसोबत साखरपुडा

जिममध्ये धोनीनं केला खतरनाक स्टंट

धोनी सध्या रांचीमध्ये जबरदस्त सराव करत आहे. जेएससीए स्टेडियममध्ये सराव करण्यासाठी दाखल झाला. यावेळी त्याने जिममध्ये घाम गाळला. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये धोनी खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी ब्लॅक पँट आणि टीशर्ट परिधान केलेला दिसत आहे. त्याच्या समोर एक बॉक्स ठेवला आहे, ज्यावर धोनी उडी मारून बसलेला दिसत आहे. चाहत्यांनी व्हिडिओवर कमेंट करत 38 वर्षांच्या धोनीनं केलेल्या या स्टंटचे कौतुक करत आहे. मुख्य म्हणजे धोनीची गणना टीमच्या फिट खेळाडूंमध्ये केली जाते. त्याची चपळता आणि मैदानावर राहण्याची क्षमता सर्वांनाच चकित करते.

वाचा-‘सचिनने खेळाडूंवर अन्याय केला’, माजी क्रिकेटपटूनं मास्टर ब्लास्टरवर केली टीका

वाचा-एका व्हिडिओमुळं संपली बुमराहची दहशत! न्यूझीलंडच्या फलंदाजांनी असा काढला मार्ग

8 महिन्यांनंतर मैदानात उतरणार धोनी

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी 29 मार्च रोजी 8 वाजता वानखेडे मैदानावर सामना होईल.याआधी धोनी कोणता सामना खेळेले याची शक्यता कमी आहे. धोनीनं अखेरचा सामना 10 जुलै 2019मध्ये खेळला होता. आता 8 महिन्यांनंतर 29 मार्च 2020 रोजी धोनी मैदानात उतरेल. दरम्यान धोनीचे टीम इंडियात कमबॅक हे त्याच्या आयपीएलमधील फॉर्मवर अवलंबून असेल. आयपीएलनंतर भारत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचे तयारी करेल.

First published: February 27, 2020, 12:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading