IND vs NZ : एका व्हिडिओमुळं संपली बुमराहची दहशत! न्यूझीलंडच्या फलंदाजांनी असा काढला मार्ग

IND vs NZ : एका व्हिडिओमुळं संपली बुमराहची दहशत! न्यूझीलंडच्या फलंदाजांनी असा काढला मार्ग

जगातल्या सर्वोत्तम आणि खतरनाक गोलंदाजाची अशी संपवली न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दहशत.

  • Share this:

क्राइस्टचर्च, 27 फेब्रुवारी : भारतीय संघाचा हुकुमी एक्का आणि फलंदाजांसाठी आजही कर्दनकाळ म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह. बुमराहच्या यॉर्करपुढे भलेभले फलंदाज मैदानात टिकू शकले नाही. मात्र न्यूझीलंड दौऱ्यात बुमराहच्या गोलंदाजीला ग्रहण लागले आहे. या दौऱ्यात एकाही मालिकेत बुमराहला चांगली कामगिरी करता आलेली नाही. भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहनं एक विकेट घेतली होती. तर, त्याआधी झालेल्या एकदिवसीय मालिकेत त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. बुमराहच्या या खराब फॉर्मवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र न्यूझीलंड दौऱ्यात एका व्हिडिओमुळं बुमराहला विकेट घेता येत नाही आहे.

वाचा-VIDEO : हसावं की रडावं! शेवटच्या चेंडूवर 5 धावा हव्या असताना जे झालं ते एकदा बघा

किवी संघाने पाहिलेत बुमराहच्या गोलंदाजीचे व्हिडिओ

न्यूझीलंडचा माजी खेळाडू जॉन राइटनं (John Wright) सांगितले की, न्यूझीलंडच्या संघानं या दौऱ्याआधी बुमराहच्या गोलंदाजीचे अनेक व्हिडिओ पाहिले आहेत. त्यामुळं त्यांनी त्याच्याविरुद्ध चांगली रणनीती तयार केली. याच कारणामुळं चांगली गोलंदाजी करूनही किवी फलंदाज त्याच्या गोलंदाजीचा सामना करत आहेत. दुखापतीतून सावरत बुमराहनं न्यूझीलंड दौऱ्यात पुनरागमन केले आहे.

वाचा-क्रिकेटप्रेमींसाठी मोठी खूशखबर! भारत आणि पाक यांच्यात होणार महामुकाबला

बुमराहला गोलंदाजीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल

जॉन राइट यांनी, बुमराह अजूनही दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळं त्याला थोडा वेळा देण्याची गरज आहे. या कठिण समयी त्याला सर्वांनी साथ दिली पाहिजे. बुमराहनं आपल्या गोलंदाजीकडे लक्ष दिल्यास, तो नक्की पुन्हा फॉर्मध्ये येईल, असे सांगितले. न्यूझीलंड दौऱ्याआधी 2-3 महिने बुमराह क्रिकेटपासून दूर होता. दुखापतीतून सावरल्यानंतर त्यानं कमबॅक केला. मात्र त्याला कमबॅक करता आला नाही.

वाचा-IPL 2020 : संघाने कॅप्टनसाठी नाही तर खेळाडूसाठी मोजली दुप्पट रक्कम

करियर बनविण्यात जॉन राइटचे योगदान

जसप्रीत बुमराहनं एका मुलाखती दरम्यान आपल्या करिअरचे श्रेय टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक जॉन राइट यांना दिले. बुमराहने सांगितले की, “माझ्या करिअरमध्ये जॉन राइटचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मी त्यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. मुंबईविरुद्ध सय्यद मुश्ताक अली सामना खेळत असताना जॉन राइट यांची नजर माझ्यावर गेली आणि माझे करिअर बदलले”. एवढेच नाही तर, “जॉन राइटने माझ्यावर तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्याचा आग्रह धरला. जॉन राईटची प्रतिभा समजून घेण्याची कला आहे. मुंबई इंडियन्सचे अनेक खेळाडू भारताकडून खेळले आहेत. मी आजही जॉन राईटशी बोलतो”, असेही सांगितले आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याआधी बुमराह आयपीएल आणि स्थानिक क्रिकेट खेळत होता. त्यानंतर 2016मध्ये एकदिवसीय तर 2018मध्ये कसोटी संघात पदार्पण केले.

First published: February 27, 2020, 8:56 AM IST

ताज्या बातम्या