कराची, 27 फेब्रुवारी : महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे नाव क्रिकेट इतिहासतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून घेतले जाते. सचिननं आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक दैदिप्यमान रेकॉर्ड आपल्या नावावर केले. मात्र एका माजी क्रिकेटपटूनं सचिनवर टीका करत एक तक्रार केली आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू इंझमाम उल हकने एक व्हिडिओ पोस्ट सचिनवर टीका केली आहे.
इमामनं आपल्या व्हिडिओमध्ये सचिनचे कौतुक करत, या जगात मास्टर ब्लास्टरसारखा खेळाडू नाही, असे म्हंटले आहे. इंझमामने आपल्या यूट्यूब चॅनलवर सहा मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो सचिनबद्दल बोलताना दिसत आहे. मात्र त्यानं या व्हिडिओमध्ये सचिनबाबत एक तक्रारही केली आहे.
वाचा-कमबॅकआधी 38 वर्षीय धोनीनं केला भयंकर स्टंट, खतरनाक VIDEO होतोय VIRAL
वाचा-फॉरेनचा जावई! ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेपटूनं केला भारतीय तरुणीसोबत साखरपुडा
लहान वयात सचिनने केला दिग्गजांचा सामना
इंझमाम उल हकने सचिनबद्दल बोलताना सांगितले की वयाच्या 16व्या वर्षी सचिन इमरान खान, वकार युनूस आणि वसीम अक्रम सारख्या गोलंदाजांचा सामना केला. इंझमाम यांनी यावेळी, “जर महान पेक्षा मोठा शब्द असेल तर मी तो सचिनसाठी वापरेन. वयाच्या 16व्या वर्षी त्यानं दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. मला वाटत नाही की इतर कोणीही हे करण्यास सक्षम असेल. पदार्पण मालिकेच्या सामन्यात तो पेशावरमध्ये फलंदाजी करीत होता. त्यावेळी त्यानं जी खेळी केली, ती कौतुकास्पद होती”, असे सांगितले.
वाचा-एका व्हिडिओमुळं संपली बुमराहची दहशत! न्यूझीलंडच्या फलंदाजांनी असा काढला मार्ग
‘युवा खेळाडूंसोबत सचिनने अन्याय केला’
सचिनचे कौतुक केल्यानंतर इंझमाम यांनी व्हिडिओच्या शेवटी सचिनबाबत तक्रारही केली. इंझमामने, 'सचिनबद्दल मला एक तक्रार आहे. त्याच्याकडे जी कला होती, ती त्यानं युवा खेळाडूंना दिली नाही. त्यानं युवा खेळाडूंना मदत करण्यासाठी पुढे यायला हवे होतेय आपले अनुभव त्यांना सांगायला हवे होते”, असे सांगितले.
हा फलंदाज मोडणार सचिनचा विक्रम
सचिनच्या विक्रमांबाबत बोलताना इंझमामने सचिनचे विक्रम कोण मोडेल, हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे, असे सांगितले. बहुतेक खेळाडू 8 ते 9 हजार धावा करून निवृत्त होता पण सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18 हजारहून अधिक धावा केल्या. त्यामुळं हा रेकॉर्ड मोडण्यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि पाकचा बाबर आझम आघाडीवर आहेत.