जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कमबॅकआधी 38 वर्षीय धोनीनं केला भयंकर स्टंट, खतरनाक VIDEO होतोय VIRAL

कमबॅकआधी 38 वर्षीय धोनीनं केला भयंकर स्टंट, खतरनाक VIDEO होतोय VIRAL

कमबॅकआधी 38 वर्षीय धोनीनं केला भयंकर स्टंट, खतरनाक VIDEO होतोय VIRAL

8 महिन्यांंनंतर महेंद्र सिंग धोनी पुन्हा मैदानात खेळताना दिसणार आहे. त्याआधी त्याच्या खतरनाक स्टंटचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

रांची, 27 फेब्रुवारी : महेंद्रसिंग धोनी बर्‍याच महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळं क्रिकेट चाहत्यांचे डोळे धोनीच्या पुनरागमनाकडे लागले आहे. रिपोर्ट्सनुसार धोनी 2 मार्चपासून चेन्नई सुपर किंग्जच्या शिबिरामध्ये सामील होईल. तत्पूर्वी, तो सध्या रांची येथे जबरदस्त सराव करत आहे. जेएससीए स्टेडियममध्ये सराव करण्यासाठी दाखल झाला. यावेळी त्याने जिममध्ये घाम गाळला. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये धोनी खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. वाचा- फॉरेनचा जावई! ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेपटूनं केला भारतीय तरुणीसोबत साखरपुडा धोनीने केला जिममध्ये स्टंट व्हिडिओमध्ये धोनी ब्लॅक पँट आणि टीशर्ट परिधान केलेला दिसत आहे. त्याच्या समोर एक बॉक्स ठेवला आहे, ज्यावर धोनी उडी मारून बसलेला दिसत आहे. चाहत्यांनी व्हिडिओवर कमेंट करत 38 वर्षांच्या धोनीनं केलेल्या या स्टंटचे कौतुक करत आहे. मुख्य म्हणजे धोनीची गणना टीमच्या फिट खेळाडूंमध्ये केली जाते. त्याची चपळता आणि मैदानावर राहण्याची क्षमता सर्वांनाच चकित करते. वाचा- एका व्हिडिओमुळं संपली बुमराहची दहशत! न्यूझीलंडच्या फलंदाजांनी असा काढला मार्ग

जाहिरात

वाचा- क्रिकेटप्रेमींसाठी मोठी खूशखबर! भारत आणि पाक यांच्यात होणार महामुकाबला धोनीने खेळपट्टीवर रोलर चालविला यापूर्वी धोनी जेएससीए स्टेडियममध्ये खेळपट्टीवर तसेच ग्राउंड पीचवर काम करताना दिसला होता, याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धोनी जेएससीएच्या मैदानावर पोहोचला जिथे त्याने प्रथम नेटवर फलंदाजीचा सराव केला. धोनीचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले होते. वाचा- टेनिस कोर्टवरची सौंदर्यवती निवृत्त, पाचवेळा ग्रँडस्लॅम विजेती 8 महिन्यांनंतर मैदानात उतरणार धोनी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी 29 मार्च रोजी 8 वाजता वानखेडे मैदानावर सामना होईल.याआधी धोनी कोणता सामना खेळेले याची शक्यता कमी आहे. धोनीनं अखेरचा सामना 10 जुलै 2019मध्ये खेळला होता. आता 8 महिन्यांनंतर 29 मार्च 2020 रोजी धोनी मैदानात उतरेल. दरम्यान धोनीचे टीम इंडियात कमबॅक हे त्याच्या आयपीएलमधील फॉर्मवर अवलंबून असेल. आयपीएलनंतर भारत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचे तयारी करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात