मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Tokyo Olympics: पराभवानंतर तलवारबाज भवानी देवीनं मागितली देशवासियांची माफी; पंतप्रधानांची प्रतिक्रिया व्हायरल

Tokyo Olympics: पराभवानंतर तलवारबाज भवानी देवीनं मागितली देशवासियांची माफी; पंतप्रधानांची प्रतिक्रिया व्हायरल

भवानी देवीनी ट्विट केलं होतं, ‘ आजचा दिवस महत्त्वाचा होता. खूप उत्साह आणि भावनांनी भरलेला. मी माझ्याकडून सर्वोच्च प्रयत्न केले पण जिंकू शकले नाही. मला माफ करा.’

भवानी देवीनी ट्विट केलं होतं, ‘ आजचा दिवस महत्त्वाचा होता. खूप उत्साह आणि भावनांनी भरलेला. मी माझ्याकडून सर्वोच्च प्रयत्न केले पण जिंकू शकले नाही. मला माफ करा.’

भवानी देवीनी ट्विट केलं होतं, ‘ आजचा दिवस महत्त्वाचा होता. खूप उत्साह आणि भावनांनी भरलेला. मी माझ्याकडून सर्वोच्च प्रयत्न केले पण जिंकू शकले नाही. मला माफ करा.’

नवी दिल्ली 27 जुलै: स्पर्धेत किंवा खेळात जय-पराजय हा खेळाडूच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. खेळाडू ऑलिम्पिकसारख्या खेळाच्या महाकुंभात सहभागी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. अनेक गोष्टींचा त्याग करतात. त्यांचं ध्येय असतं आपल्या कामगिरीने देशाला पदक मिळवून देण्याचं. ते पूर्ण होऊ शकलं नाही तर त्यांना वाईट वाटतं. असंच काहीसं घडलं भारतीय तलवारबाज सीए भवानी देवी (Bhavani Devi) हिच्याबाबतीत. 26 जुलैला टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) झालेल्या दुसऱ्या सामन्यात तिचा पराभव झाल्यानंतर तिने ट्विट करून देशवासीयांची माफी मागितली. पण तिच्या या ट्विटला रिट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तिला धीर दिला. एखाद्या पित्याप्रमाणे तिच्या कामगिरीचं कौतुक केलं आणि तिची समजूत काढली. पंतप्रधानांचं हे ट्विट खूप व्हायरल होत आहे.

भवानी देवीनी ट्विट केलं होतं, ‘ आजचा दिवस महत्त्वाचा होता. खूप उत्साह आणि भावनांनी भरलेला. पहिल्या सामन्यात मी नादिया अझिझिला 15/3 असं पराभूत केलं आणि ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा (Olympics Fencing Match) सामना जिंकणारी पहिली महिला ठरले पण दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मनॉन ब्रुनेटकडून मात्र मी 7/15 अशी पराभूत झाले. मी माझ्याकडून सर्वोच्च प्रयत्न केले पण जिंकू शकले नाही. मला माफ करा.’

Explainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून? वाचून ज्ञानात पडेल भर

भवानीदेवीच्या या ट्विटनंतर पंतप्रधानांनी ते रिट्विट करत तिला धीर दिला. त्यात त्यांनी लिहिलं, ‘तू सर्वोत्तम प्रयत्न केलेस आणि त्यालाच सर्वाधिक महत्त्व आहे. जय पराजय हा जीवनाचा भागच आहे. भारताला तुझ्या योगदानाचा अभिमान वाटतो. देशवासीयांसाठी तू प्रेरणास्रोत आहेस.’

ऑलिम्पिकच्या इतिहासात तलवारबाजी (Fencing) या खेळासाठी क्वालिफाय होणारी पहिली महिला भवानी देवीने साबरे प्रकारात पहिल्या सामन्यात ट्युनिशियाच्या नादिया अझिझिला 15-3 असं पराभूत केलं पण दुसऱ्या सामन्यात मात्र तिला जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या मनॉन ब्रुनेटकडून 7/15 अशी हार पत्करावी लागली.

Tokyo Olympics : भारतासाठी निराशाजनक दिवस, दिग्गज खेळाडूंचे आव्हान संपुष्टात

सुरुवातीपासून पिछाडीवर होती भवानी

दुसऱ्या सामन्यात भवानी देवीची कामगिरी विशेष नव्हती. सुरुवातीपासूनच ती पिछाडीवर होती. सामन्याच्या पहिल्या भागात ती 2-8 ने पिछाडीवर होती. ब्रुनेटने सुरुवात चांगली केली आणि 11-2 असा स्कोअर केला. भवानीने नंतर सलग 4 गुण मिळवले पण ब्रुनेटला विजयापासून रोखू शकली नाही. भवानी देवीने 13 वर्षांपूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेत पहिलं आंतरराष्ट्रीय पदक जिंकलं होतं त्यानंतर 2014 च्या आशियाई स्पर्धेत तिने रौप्य पदक पटकावलं होतं.

चानूने मानले पंतप्रधानांचे आभार

दरम्यान, वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवून देणारी महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू (Meerabai Chanu) सोमवारी भारतात परतली. दिल्ली एअरपोर्टवर तिचं जंगी स्वागत करण्यात आलं. तिने आपलं पदक देशाला समर्पित केलं आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडामंत्र्यांना धन्यवाद दिले. ती म्हणाली, ‘ माझ्या खेळाच्या तयारीसाठी खूपच कमी वेळात म्हणजे एका दिवसात सगळी तयारी करून मला अमेरिकेला पाठवण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री यांना धन्यवाद देते. त्यांच्यामुळेच मला चांगलं प्रशिक्षण मिळालं आणि मी देशासाठी पदक जिंकू शकले. माझ्या यशाचं श्रेय टॉप्स (टारगेट ऑलिंपिक पोडियम योजना TOPS) या योजनांनाही जातं.’

First published:

Tags: Bhavani devi, Olympics 2021