मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Tokyo Olympics: भारतासाठी निराशाजनक दिवस, दिग्गज खेळाडूंचे आव्हान संपुष्टात

Tokyo Olympics: भारतासाठी निराशाजनक दिवस, दिग्गज खेळाडूंचे आव्हान संपुष्टात

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतासाठी सोमवारचा दिवस निराशाजनक ठरला. टेबल टेनिस,  टेनीस, शूटींग, तिरंदाजी, आणि बॅडमिंटन या पाच खेळात भारतीय खेळाडूंचा पराभव झाला.

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतासाठी सोमवारचा दिवस निराशाजनक ठरला. टेबल टेनिस, टेनीस, शूटींग, तिरंदाजी, आणि बॅडमिंटन या पाच खेळात भारतीय खेळाडूंचा पराभव झाला.

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतासाठी सोमवारचा दिवस निराशाजनक ठरला. टेबल टेनिस, टेनीस, शूटींग, तिरंदाजी, आणि बॅडमिंटन या पाच खेळात भारतीय खेळाडूंचा पराभव झाला.

टोकयो, 20 जुलै: टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतासाठी सोमवारचा दिवस निराशाजनक ठरला. टेबल टेनिस,  टेनीस, शूटींग, तिरंदाजी, आणि बॅडमिंटन या पाच खेळात भारतीय खेळाडूंचा पराभव झाला. देशांतर्गत स्तरावरील चॅम्पियन असलेल्या या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही जोरदार कामगिरी करत ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले होते. त्यामुळे त्यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा होत्या. या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये निराशा केली.

मानिका बत्राचं आव्हान संपुष्टात

महिला टेबल टेनिसमधील भारताची एकमेव आशास्थान असलेली भारताची मानिका बात्रा (Manika Batra) तिसऱ्या फेरीत पराभूत झाली. मानिकाचा ऑस्ट्रियाच्या (Austria) सोफिया पोल्कानोवानं पराभव केला. सोफियानं मानिकाचा 11-8, 11-2, 11-5, 11-7 असा चार  सरळ गेममध्ये पराभव केला. मानिकानं रविवारी पहिले दोन गेम पराभूत झाल्यानंतर जिद्दीनं पुनरागमन करत तिसरी फेरी गाठली होती. या फेरीत तिची जादू चालली नाही.

टेनिसमध्ये निराशा

भारताचा टेनिस स्टार सूमित नागलचं (Sumit Nagal) आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले.  रशियाच्या डेनियल मेदवदेवनं सूमितचा 6-2,6-1 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. वर्ल्ड नंबर 2 मेदवदेव विरुद्ध विजयासाठी मोठ्या चमत्काराचीच सूमितला गरज होती. टेनिसमध्ये महिला दुहेरीत भारताचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे.

तिरंदाजांचा पराभव

भारताच्या पुरुष तिरंदाजांनी पहिली मॅच जिंकून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. प्रवीण जाधव (Pravin Jadhav), अतनू दास (Atanu Das) आणि तरुणदीप राय (Tarundeep Rai) या भारतीय टीमचा दक्षिण कोरियाच्या टीमनं तीन सरळ सेटमध्ये पराभव केला.

बॅडमिंटनमध्ये पराभव

बॅडमिंटनमध्येही भारताची निराशा झाली. सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही दुहेरीतील भारतीय जोडी पहिल्याच फेरीत पराभूत झाली. इंडोनेशियाच्या  वर्ल्ड नंबर वन गिडियोन फर्नाल्डी आणि केविन संजया सुकामुल्जो या जोडीनं त्यांचा 21-13, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव केला.

एकाच खेळात 13 वर्षांच्या 2 मुलींची कमाल, एकीला gold तर दुसरीला silver!

शूटर्सचा निशाणा चुकला

भारतीय शूटर्सकडून या स्पर्धेत मोठी अपेक्षा होती. सलग तिसऱ्या दिवशी त्यांना मेडल मिळवण्यात अपयश आले. स्कीट शूटींगमध्ये अंगद वीर सिंह आणि मेराज अहमद यांचा पहिल्याच फेरीत पराभव झाला. अंगद वीर सिंहनं 19 वा क्रमांक पटकावला. मेराज अहमदची कामगिरी तर आणखी निराशाजनक झाली. तो 25 व्या क्रमांकावर फेकला गेला.

First published:

Tags: Olympics 2021