मुंबई, 22 जानेवारी : भारताचा स्टार क्रिकेटर के एल राहुल आणि बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री अथिया शेट्टी उद्या 23 जानेवारी रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. के एल राहुल आणि अथियाचे फॅन्स या दोघांच्या लग्नाविषयी फारच उत्सुक आहेत.
के एल राहुल आणि अथिया या दोघांचा लग्न सोहोळा कसा असेल, हे दोघे लग्नात कोणते कपडे घालतील इत्यादी अनेक गोष्टी फॅन्सला जाणून घेण्यात रस आहे. मात्र राहुल आणि अथिया या दोघांनी आपल्या लग्नसोहोळ्या विषयी अतिशय सस्पेन्स क्रिएट केला आहे. 21 जानेवारी पासून या दोघांच्या लग्न सोहोळ्याचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. परंतु या दोघांनी त्यांच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना फोन घेऊन येण्यास बंदी घातली आहे.
हे ही वाचा: मित्राच्या बायकोवरच जडलं प्रेम, भारतीय क्रिकेट विश्वातील या हटके लव्हस्टोरी विषयी माहितीये का?
के एल राहुल आणि अथिया शेट्टी या दोघांचे लग्न सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर होणार आहे. या लग्नसोहोळ्यासाठी अतिशय मोजक्या 100 पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हे सर्व पाहुणे खंडाळा येथील रॅडिसन हॉटेलमध्ये राहणार असून त्यांना लग्न सोहोळ्यात उपस्थित राहण्याआधी अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, लग्नादरम्यान सर्व पाहुण्यांचे मोबाईल जप्त केले जातील. लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कोणतेही सेलिब्रिटी आणि क्रिकेटर या लग्नाला उपस्थित राहणार नाहीत. काही दिवसांनंतर के एल राहुल आणि अथियाचे रिसेप्शन पारपडेल ज्यात सर्वांना आमंत्रित केले जाईल.
हे ही वाचा : गजनी हिटमॅन! टॉसचा निर्णय तर सोडाच मैदानात 'ही' गोष्ट देखील विसरला होता रोहित
के एल राहुल आणि अथिया शेट्टी या दोघांचे लग्न दक्षिण भारतीय परंपरेनुसार होणार आहे. या दोघांच्या लग्नासाठी सध्या खंडाळाचा फार्म हाऊस सजला आहे. 21 जानेवारीला संगीत आणि लेडीज नाईटचा कार्यक्रम पारपडला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Cricket, Cricket news, Kl rahul, Sunil shetty