जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / गजनी हिटमॅन! टॉसचा निर्णय तर सोडाच मैदानात 'ही' गोष्ट देखील विसरला होता रोहित

गजनी हिटमॅन! टॉसचा निर्णय तर सोडाच मैदानात 'ही' गोष्ट देखील विसरला होता रोहित

गजनी हिटमॅन! टॉसचा निर्णय तर सोडाच मैदानात 'ही' गोष्ट देखील विसरला होता रोहित

शनिवारी न्यूझीलंडवरील भारताच्या विजयापेक्षा कर्णधार रोहित शर्माच्या विसरभोळ्या स्वभावाचीच जास्त चर्चा झाली. अशातच आता विसराळू रोहितचा अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रोहित मैदानात जात असताना महत्वाची गोष्ट घेऊन जाण्यास विसरला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 जानेवारी : शनिवारी रायपूरमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेतील दुसरा सामना पारपडला. या सामन्यात भारताच्या विजयापेक्षा कर्णधार रोहित शर्माच्या विसरभोळ्या स्वभावाचीच जास्त चर्चा झाली. दुसऱ्या वनडे सामन्याआधी रोहित शर्मा न्यूझीलंडच्या कर्णधारासोबत टॉससाठी गेला, परंतु टॉस जिंकल्यानंतर रोहित बॉलिंग आणि बॅटिंगपैकी नक्की काय निवडायचे तेच विसरला. यावरून रोहित शर्माला सोशल मीडियावर फार ट्रोल केलं जात आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यान टॉसचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. अशातच आता विसराळू रोहितचा अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रोहित मैदानात जात असताना बॅट ही विसरल्याचे दिसते. हे ही वाचा : स्टार क्रिकेटर अडकला लग्नबंधनात; सोशल मीडियावर फोटो व्हायरल रोहित बॅटिंगसाठी मैदानात जात असताना तो खाली मान घालून काहीतरी विचार करीत होता. तेवढ्यात त्याला मागून संघाच्या स्टाफने आवाज दिला. त्यानंतर रोहित शर्मा पुन्हा मैदानाबाहेर आला आणि बॅट घेऊन पुन्हा खेळपट्टीवर उतरला.

जाहिरात

विराट कोहलीने देखील एका मुलाखतीत रोहितच्या विसरभोळेपणा विषयी सांगितले होते. विराट म्हणाला होता की, रोहित शर्मा जितका विसरभोळा आहे तितकं कोणी असेल असं मलावाटत नाही. आयपॅड, वॉलेट, घड्याळ, दररोज वापरासारख्या गोष्टी तो अनेकदा विसरतो. इतकंच नाही तर त्याला आपण आपलं सामान विसरलोय हे, देखील कळत नाही. एकदा त्याला हॉटेलमध्ये गेल्यावर आठवलं होतं की त्याचा आयपॅड विमानात राहिला होता. तसेच रोहित एकदा त्यांची इंगेजमेंट रिंग देखील हॉटेलच्या रूमवर विसरला आहे"

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात