मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'कोहलीला 20 कोटी मिळतात म्हणून चांगला खेळतो नाहीतर...', माजी क्रिकेटपटूचे धक्कादायक वक्तव्य

'कोहलीला 20 कोटी मिळतात म्हणून चांगला खेळतो नाहीतर...', माजी क्रिकेटपटूचे धक्कादायक वक्तव्य

विराट कोहली सध्या पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. मात्र त्याला जास्त पैसे मिळतात, म्हणून तो चांगला खेळतो अशी टीका पाक खेळाडूनं केली आहे.

विराट कोहली सध्या पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. मात्र त्याला जास्त पैसे मिळतात, म्हणून तो चांगला खेळतो अशी टीका पाक खेळाडूनं केली आहे.

विराट कोहली सध्या पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. मात्र त्याला जास्त पैसे मिळतात, म्हणून तो चांगला खेळतो अशी टीका पाक खेळाडूनं केली आहे.

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : विराट कोहली सध्या पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. भारतीय संघाचा कर्णधार सध्या फॉर्ममध्ये नसला तरी, जगातला सर्वोत्तम फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. प्रतिस्पर्धी संघासाठी विराटची विकेट म्हणजे सामना जिंकलो, असे मानले जाते. असे असले तरी, एका माजी क्रिकेटपटूनं विराटवर जहरी टीका केली आहे.

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकनं, “विराट कोहली दोन महिन्यांला 20 कोटी मिळतात म्हणून तो चांगला फलंदाज आहे”, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. काही महिन्यांपूर्वी रज्जाकनं हार्दिक पांड्याला प्रशिक्षण देण्याची ऑफर दिली होती. रज्जाकनं फक्त विराटवर नाही तर वीरेंद्र सेहवागवरही विचित्र टिप्पणी केली आहे. रज्जाकने, “विरेंद्र सेहवागला स्टार फलंदाज करण्यामागे पाकचा मोठा हात होता. आमच्या खराब क्षेत्ररक्षणामुळं सेहवाग चांगली कामगिरी करू शकला”, असे विचित्र वक्तव्य केले. रज्जाकनं हे वक्तव्य पाकच्या टिव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केले.

वाचा-विराटला झालंय काय? पहिल्याच कसोटी सामन्यात केला लाजीरवाणा रेकॉर्ड

वाचा-मॉडेलच्या हॉट डान्सने युजवेंद्र चहल घाबरला आणि पळत सुटला, पाहा हा VIDEO

भारतीय क्रिकेटपटू आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आहे

रज्जाकने भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटची दृष्टी सादर केली. यावेळी त्यानं "पाकिस्तानात नैसर्गिक प्रतिभा अधिक आहे. आयपीएल असल्याने भारतीय संघ चांगला खेळतो. जर ते काढून टाकले तर तेथील क्रिकेटपटूची कामगिरी सरासरी आहेत. आपली व्यवस्था खराब आहे. जर दोन महिन्यांसाठी विराट कोहलीला 20 कोटी रुपये मिळाले तर का नाही खेळणार? ”, असा सवालही केला.

वाचा-पावसाने फेरले पहिल्या दिवसावर पाणी, अजिंक्यच्या एकहाती खेळीने भारताला वाचवलं

वाचा-‘IPLसाठी चिअर गर्ल्स मिळाल्या’, पाक महिला संघाच्या त्या डान्सवर भडकले चाहते

‘सेहवागला आम्ही स्टार केले’

वीरेंद्र सेहवागबद्दल रज्जाक यांनी विचित्र भाष्य केले. तो म्हणाला की, "वीरेंद्र सेहवागला फुटवर्क नव्हता. त्याचे डोळे आणि बॅचाट स्विंग विचित्र होता. त्याने मुलतानमध्ये तिहेरी शतक झळकावले कारण आम्ही 8 झेल सोडल्या. पाकिस्तानचा संघ नेहमी खेळाडू घडवतात. जे खेळाडू कामगिरी करत नाही ते आमच्याविरुद्ध करतात”, असे सांगत ऑस्ट्रेलियाच्या सायमंड्सलाही पाकने स्टार केल्याचे मत व्यक्त केले.

First published:

Tags: Cricket, Virat kohli