सिडनी, 21 फेब्रुवारी : आजपासून आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2020ला सुरुवात होत आहे. वर्ल्ड कपमधला पहिलाच सामना भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. त्यामुळं सर्वच संघ या विजेतेपदासाठी सज्ज आहेत. या सगळ्यात गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तान महिला क्रिकेट संघाच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात व्हिडिओमध्ये खेळाडू स्वत: गाणे गात डान्स करत आहे. आयसीसीनं हा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तानी संघाची अष्टपैलू खेळाडू इरम जावेद बॅटसोबत डान्स करताना दिसत आहे. तर, इतर सहकारीही तिच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. आयसीसीनं हा व्हिडिओ पाकिस्तानचा महिला संघ रॉकस्टार असे कॅप्शन देत शेअर केला आहे.
Pick the beat
— T20 World Cup (@T20WorldCup) February 18, 2020
Set the rhythm
Make your own music pic.twitter.com/rrWnnenq8A
व्हायरल व्हिडिओवर भडकले पाकिस्तान चाहते
दरम्यान पाकिस्तानी महिला संघाच्या या डान्सवर पाक चाहते चांगलेच भडकले आहेत. तर, भारतीय चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. काही चाहत्यांनी आयपीएलसाठी चिअर लीडर मिळाल्या अशा कमेंट केल्या आहे. तर, काहींनी आयसीसीलाच ट्रोल केले आहे.
Kash thori cricket b seekh lain... baqi her kam main expert hain yeah
— AQ (@aqeelraja643) February 19, 2020
Har jaga panga karna zaruri hota hai mohalle ki churail
— Syeda Zara Kazmi (@ZaraPAF) February 19, 2020
We need this type cheer girls for @IPL
— Kuldeep Thakre (@kuldeepthakre2) February 19, 2020
Larkyon ko ye Kam zeb nai dety upar se asi Harkten Ye dance party H ya Icc official shame on You Girl's
— Haris Rauf Lover's (@Harisrauf150) February 19, 2020
पाकिस्तानचा महिला संघही (Pakistan Women Team) ऑस्ट्रेलियाला पोहलचा असून, या स्पर्धेची सुरुवात विजयानं करण्यासाठी पाक संघ सज्ज आहे. भारत-पाक यांच्यात याआधी एक सराव सामना होणार होता, मात्र पावसामुळं हा सामना रद्द झाला. भारत-पाक दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात असल्यामुळं चाहत्यांना यांच्यातील लढतीसाठी वाट पाहावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.