वेलिंग्टन, 21 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथील मैदानात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेला भारतीय संघ पत्त्यासारखा कोसळला. पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीला चांगली कामगिरी करता आली नाही. केवळ 2 धावा करत विराट बाद झाला. पहिल्याच कसोटी सामन्यात विराटनं निराशाजनक कामगिरी करत आपल्या नावावर लाजीरवाण्या विक्रमांची नोंद केली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध भारतीय कर्णधार विराट कोहलीला चांगली सुरुवात करता आली नाही. पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर कोहली फलंदाजीसाठी आला. मात्र 7 चेंडू खेळल्यानंतर त्यानं केवळ 2 धावा केल्या आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रॉस टेलरच्या हाती कॅच देत बाद झाला. भारतीय कर्णधाराची न्यूझीलंडच्या भुमीवर दुसरी खराब खेळी करणारा कर्णधार ठरला आहे. मुख्य म्हणजे आयसीसी क्रमवारीत कसोटीमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या यादीत विराट पहिल्या क्रमांकावर आहे.
वाचा-टी-20मधून निवृत्ती घेणार विराट? पहिल्यांदाच कॅप्टन कोहलीनं केला खुलासा
न्यूझीलंडच्या संघाने घरच्या मैदानावर गेल्या 14 कसोटी मालिकांपैकी केवळ दोन मालिका गमावल्या आहेत. भारतानंतर घरेलू मैदानावर अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा नंबर लागतो. 2018 नंतर भारताने घरच्या मैदानावर एकही मालिका गमावली नाही तर न्यूझीलंडने 2017 मध्ये शेवटचा पराभव पत्करला होता. त्यामुळं न्यूझीलंडमध्ये विजय मिळवण्यासाठी भारताला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.
वाचा-दुहेरी शतक झळकवणाऱ्या खेळाडूला विराट देणार नाही संधी!
Virat Kohli now! Kyle Jamieson has his second as Ross Taylor gets into the game at 1st slip. Kohli goes for 2. India 3 down now. LIVE scoring | https://t.co/vWdNIMMIwd #NZvIND pic.twitter.com/eE6hMsLGnu
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 20, 2020
वाचा-मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! IPLआधी फिट होणार रोहितचा हुकुमी एक्का
न्यूझीलंडविरुद्ध भारतीय कर्णधारांची खेळी
विराट कोहलीनं निराशाजनक कामगिरी केली असली, तरी असं करणारा तो पहिला कर्णधार नाही आहे. याआधी माजी कर्णधार सौरव गांगुली आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात केवळ 2 धावा करत बाद झाला. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात याआधी कर्णधार म्हणून नवाब पटौडी यांनी 11, सुनील गावस्कर नाबाद 35, बिशन सिंग बेदी 30 धावा, मोहम्मद अझहरुद्दीन 30 आणि विरेंद्र सेहवाग 22 धावा केल्या आहेत.
वाचा-'...नाहीतर विराटसारखी अवस्था होईल', फोटो वापरून पोलिसांनी दिला सल्ला
धोनी पहिल्या क्रमांकावर
भारतीय कर्णधार म्हणून न्यूझीलंडविरुद्ध सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. पहिल्या डावात धोनीनं सर्वात जास्त 47 धावा केल्या आहेत. 18 मार्च 2009मध्ये हॅमिल्टन येथे झालेल्या सामन्यात पहिल्या डावात धोनीनं 123 चेंडूत 47 धावा केल्या आहेत. तर, दुसऱ्या क्रमांकावर सुनील गावस्कर यांची 35 धावांची खेळी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs new Zealand