कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळतो असं मानलं जातं. पण भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात मात्र वातावरण वेगळं आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असे आहेत. त्यामुळे कोणत्याच संघाला विजयाचा दावेदार मानता येणार नाही. न्यूझीलंडच्या संघाने घरच्या मैदानावर गेल्या 14 कसोटी मालिकांपैकी केवळ दोन मालिका गमावल्या आहेत. भारतानंतर घरेलू मैदानावर अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा नंबर लागतो. 2018 नंतर भारताने घरच्या मैदानावर एकही मालिका गमावली नाही तर न्यूझीलंडने 2017 मध्ये शेवटचा पराभव पत्करला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका महत्वाची असणार आहे. आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये न्यूझीलंडचे मोठे आव्हान भारताला आहे. सध्या भारताचे 360 गुण झाले असून कागदावर तरी न्यूझीलंडपेक्षा भारत पुढे आहे. तर न्यूझीलंडला घरच्या मैदानाचा फायदा आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. टी20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर उद्यापासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. टी20 मध्ये भारताने 5-0 ने बाजी मारली तर एकदिवसीय मालिका न्यूझीलंडने जिंकली. विराटच्या नेतृत्वाखाली सध्या भारताचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने यात कोण बाजी मारणार हे सांगणं कठीण आहे. या मालिकेत विराट कोहली अंतिम अकरा जणांमध्ये कोणाला संधी देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. प्लेइंग इलेव्हन : पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह. वाचा : 'सिनिअर-ज्युनिअर मुद्दाच नाही, पंतने स्वीकारावं की...',रहाणेनं दिला सल्लाSTUMPS!
— BCCI (@BCCI) February 21, 2020
There will be no further play on Day 1 due to rains #NZvIND pic.twitter.com/wFkbJeSNyA
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.