NZ vs AUS : रोहित शर्माला धक्का देत मार्टिन गप्टीलने केला स्पेशल विक्रम!

NZ vs AUS : रोहित शर्माला धक्का देत मार्टिन गप्टीलने केला स्पेशल विक्रम!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या टी-20 मध्ये न्यूझीलंडचा (New Zealand vs Australia) 7 विकेटने विजय झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता मार्टिन गप्टीलने (Martin Guptill) रोहित शर्माला (Rohit Sharma) मागे टाकत दुसरं स्थान पटकावलं आहे.

  • Share this:

वेलिंग्टन, 7 मार्च : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या टी-20 मध्ये न्यूझीलंडचा (New Zealand vs Australia) 7 विकेटने विजय झाला. याचसोबत किवी टीमने ही सीरिज 3-2 ने जिंकली. न्यूझीलंडने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा टी-20 सीरिजमध्ये पराभव केला. पहिले बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 142 रन केले. न्यूझीलंडने हे आव्हान 15.3 ओव्हरमध्ये तीन विकेट गमावून पूर्ण केलं. मार्टिन गप्टील न्यूझीलंडच्या या विजयाचा हिरो ठरला. त्याने 46 बॉलमध्ये 71 रनची खेळी केली. गप्टिलच्या या खेळीमध्ये 7 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता.

रोहितच्या पुढे गेला गप्टील

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता मार्टिन गप्टीलने (Martin Guptill) रोहित शर्माला (Rohit Sharma) मागे टाकत दुसरं स्थान पटकावलं आहे. गप्टिलने 99 मॅचमध्ये दोन शतकं आणि 17 अर्धशतकांसह 2,839 रन केले आहेत. तर रोहित शर्माने 108 मॅचमध्ये 4 शतकं आणि 17 अर्धशतकांसह 2,773 रन केले. पहिल्या क्रमांकावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आहे. विराटने 85 मॅचमध्ये 2,928 रन केले आहेत. गप्टिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध या सीरिजमध्ये दोन अर्धशतकं करत 218 रन केल्या.

मॅक्सवेल पुन्हा फेल

टॉस जिंकून पहिले बॅटिंगला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. फक्त 8 रनच्या स्कोअरवर ओपनर जॉस फिलीपला ट्रेन्ट बोल्टने आऊट केलं. यानंतर एरॉन फिंर (36) आणि मॅथ्यू वेड (44) यांनी 66 रन जोडले. फिंच आऊट झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) मैदानात उतरला, पण तो या मॅचमध्येही अपयशी ठरला. एक रन करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. आयपीएल लिलावात (IPL Auction 2021) बँगलोरने (RCB) मॅक्सवेलला 14 कोटी 25 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये मॅक्सवेलला फक्त 92 रन करता आले.

Published by: Shreyas
First published: March 7, 2021, 11:08 AM IST

ताज्या बातम्या